Adani Green Energy Tarali project clarification
esakal
सातारा : तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पावरून पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने स्पष्टीकरण दिले आहे. हा प्रकल्प वन विभागाच्या अधिसूचित संरक्षित क्षेत्रात येत (Adani Green Energy Tarali project clarification) नसून, त्यामध्ये कोणत्याही वनजमिनीचा समावेश नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक त्या कायदेशीर परवानग्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त केल्याचे कंपनीने मंगळवारी (दि. १७) प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.