
-सुनील शेडगे
नागठाणे : एरवी सापाचे केवळ नाव जरी उच्चारले तरी मनात भीती दाटून येते. मात्र, निसर्गातील अन्नसाखळीत सापाचे महत्त्व हे अनन्यसाधारण मानले जाते. याच पार्श्वभूमीवर युवराज कणसे हे प्राथमिक शिक्षक गेली दोन दशके सापांविषयी समाजात जनजागृती करत आहेत.