esakal | शिक्षणविरोधी धोरणामुळेच शिक्षकांचे पुरस्कार रोखले - पावसकर
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

शिक्षणविरोधी धोरणामुळेच शिक्षकांचे पुरस्कार रोखले - पावसकर

sakal_logo
By
प्रशांत घाडगे -@ghadgepd

सातारा : राज्यातील शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

हेही वाचा: शहराच्या मार्केट यार्ड परिसरात झळकले वेगवेगळे फ्लेक्स

राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना पाच सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर बंद करण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनामुळे पुरस्कार देण्यात आले नव्हते. यंदा कोरोना आटोक्यात आल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र, राज्य सरकार अद्यापही गाफील असल्याचे दिसते.

दरम्यान, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोहळे पार पाडणाऱ्या ठाकरे सरकारला राज्याचे पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही, असा आरोपही पावसकर यांनी केला.

हेही वाचा: पिंपळाच्या पानांवर अनोखी कलाकारी; लॉकडाउनमध्ये साकारली चित्रमय दुनिया

राष्ट्रीय पातळीवर राज्यातील शिक्षकांचा सन्मान होत असताना, शालेय शिक्षणात महत्त्‍वाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवले आहे. यंदाचे पुरस्कार तातडीने जाहीर करून शिक्षण क्षेत्राचा अपमान थांबवावा, अशी मागणीही या पत्रकात करण्यात आली आहे.

loading image
go to top