
-रुपेश कदम
दहिवडी: प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत संवर्ग १ चा लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी केलेला गैरप्रकार माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यावर शिक्षण विभागात खळबळ माजली. मात्र कागदपत्रे तपासणी नंतर करण्यात येत असलेली निलंबनाची थातूरमातूर कारवाई ही गैरप्रकाराला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. बोगस दिव्यांगांवर कठोर कारवाई करुन त्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. सोबतच हे रॅकेट चालवणाऱ्या आकाच्या आकावर ठोका पडला पाहिजे..