esakal | Corona Virus : कोरोनाच्या धास्तीने नागठाण्यात दहा दिवसांचा कर्फ्यू

बोलून बातमी शोधा

Public Curfew

Corona Virus : कोरोनाच्या धास्तीने नागठाण्यात दहा दिवसांचा कर्फ्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागठाणे : कोरोनाच्या वाढत्या धास्तीमुळे येथील ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांनी दहा दिवसांचा जनता कर्फ्यूचे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ 30 एप्रिलपर्यंत पूर्ण बंद राहणार आहे. नागठाणे परिसरातील 50 हून अधिक गावांचा येथे दैनंदिन संपर्क असतो.

गेल्या काही दिवसांपासून गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिसरातील गावांतही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलिस ठाणे, ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांनी कडक उपाययोजना राबविताना जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला. त्यानुसार येथील बाजारपेठ दहा दिवस बंद राहील. या काळात गावातील औषध दुकाने व दवाखाने नियोजित वेळेत चालू राहतील. अत्यावश्‍यक सेवेतील वस्तू पार्सलने देण्याची व्यापाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या व्यावसायिकांविरोधात 'पंचायत' आक्रमक

Edited By : Balkrishna Madhale