ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा

ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा

अंगापूर (सातारा) : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत, तसेच वीज वितरणाची बोगस बिले अदा केली जाणार नाहीत, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.

ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा
अंगापूर वंदनची यात्रा दुसऱ्या वर्षीही रद्द; साताऱ्यात जमावबंदी लागू

अंगापूर वंदन येथे संघटनेचे संघटक मनोहर येवले यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, दत्तात्रय पाटील, संजय जाधव, रमेश पिसाळ आदी उपस्थित होते. श्री. शेळके म्हणाले, ‘‘सातारा येथे ऊसदराचे (एफआरपी) तुकडे व महावितरणची बोगस बिले या विरोधामध्ये शेतकऱ्यांची एकजूट होत असून, संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर याबाबत गावोगावी शेतकरी मेळावे घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याला गावोगावी वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुरांडे यावर्षी पेटू देणार नाही. शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे या विरोधात एकजूट करून लढले पाहिजे. आजपर्यंत फक्त शेजारच्या जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या रास्त दरासाठी भांडत आहेत आणि आपला जिल्हा क्रांतिकारकांचा असूनदेखील गप्प बसून मिळेल तो व मिळेल तसा दर घेऊन लाचारपणे जगत आहे. आता याविरुद्ध आपणच लढा दिला पाहिजे.’’

ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा
अंगापूर वंदनच्या सरपंचपदी वर्षा कणसे; 'ग्रामविकास'चे 11 उमेदवार मताधिक्‍याने विजयी

शासनाने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान दिले नाही, तसेच महावितरण खोटी बिले छापून शेतीपंपाच्या वसुलीसाठी बिघाड करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. एवढे असूनसुद्धा एकही लोकप्रतिनिधी यावर अवाक्षर काढत नाही, असा आरोपही शेळके यांनी केला. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वत: लढण्यास तयार राहा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा
मोही गावच्या पावलावर पाऊल ठेवत अंगापूर तर्फ तारगावात 'महिलाराज'

मेळाव्यास राजेंद्र शेडगे, तुकाराम शेडगे, कृषिभूषण योगेश पवार, सौरभ कोकीळ, समाधान कणसे, अमोल कणसे, बजरंग कणसे, तसेच अंगापूर, वर्णे, फडतरवाडी, निगडी, कामेरी, धोंडेवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पांडुरंग गवळी यांनी प्रास्ताविक केले. जयवंत जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com