लेकीचा वर्दीतील रुबाब; ग्रामस्थांनी केलं महिला फौजीचे जंगी स्वागत I Indian Army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Chikane

सहा महिन्यांपूर्वी शिल्पाची आसाम रायफलमध्ये निवड झाली होती.

लेकीचा वर्दीतील रुबाब; ग्रामस्थांनी केलं महिला फौजीचे जंगी स्वागत

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (सातारा) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमध्ये (Assam Rifles) भरती होऊन गांजे गावामध्ये प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या शिल्पा चिकणे (Shilpa Chikane) हिचे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण, भारत माता की जयचा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाची कडक एन्ट्रीने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले.

सहा महिन्यांपूर्वी शिल्पाची आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिला प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी परत येत असल्याच्यानिमित्ताने महिला सरपंच लक्ष्मी चिकणे व इतर महिलांनी शिल्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली. गांजेतील पांडुरंग चिकणे यांची ही चौथी कन्या. घरची परिस्थिती बेताची. आई-वडील शेतकरी. मुलगा नाही म्हणून नाराज असणाऱ्या या कुटुंबात शिल्पाने मुलाची कमतरता भरून काढत मुलाच्या तोडीचे काम केले.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

Shilpa Chikane

Shilpa Chikane

गांजे गावातून मेढ्याला पायी जात जावळी करिअर ॲकॅडमीमधे प्रचंड कष्ट करत शिल्पाने आसाम रायफलमधे भरती होण्यासाठी प्रयत्न केले. आज तिने प्रशिक्षणाचा अवघड टप्पा पार करून आपल्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. दरम्यान, लेकीचा वर्दीतील रुबाब, ग्रामस्थांनी केलेले जंगी स्वागत पाहून मनाचे समाधान झाले. आज मुलगा नसल्याचे शल्य न वाटता लेकीचा अभिमान वाटत आहे. हे सर्व पाहून मन भरून आले, अशी प्रतिक्रिया शिल्पाचे वडील पांडुरंग चिकणे यांनी या स्वागतावेळी दिली.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

loading image
go to top