निम्म्या कऱ्हाडवर विमानतळाच्या कलर कोडिंगचा रेड झोन

गोटे निम्मे गाव रेड झोनमध्ये आले आहे. पाच वेगवेगळ्या रंगात नकाशा प्रसिद्ध झाला आहे
निम्म्या कऱ्हाडवर विमानतळाच्या कलर कोडिंगचा रेड झोन

कऱ्हाड: बहुचर्चीत कऱ्हाडच्या विमानतळ धावपट्टीच्या केंद्रबिंदूपासून तीन किलोमीटरचे हवाई अंतर कायम ठेवत विमानतळ प्राधीकरणाने रेड झोन जाहीर करून कलर कोडींग नकाशा आज प्रसिद्ध केला. त्यानुसार निम्म्या कऱ्हाड शहराचा रेड झोनमध्ये समावेश झाला आहे. मलकापूर त्यातून वगळले आहे. कऱ्हाडसह वारूंजी, सुपने, विजयनगर, मुंढे गावे पूर्णतः तर गोटे निम्मे गाव रेड झोनमध्ये आले आहे. पाच वेगवेगळ्या रंगात नकाशा प्रसिद्ध झाला आहे. त्यात लाल रंग (रेड झोन) वगळता अन्य चार रंगच्या हद्दीत ३० मीटरपर्यंतचे म्हणजेच १०० फुंटाच्या बांधकामाला विमानतळ प्राधीकरणाच्या न हरकत दाखल्याची गरज नाही, असेही जाहीर केले आहे.

निम्म्या कऱ्हाडवर विमानतळाच्या कलर कोडिंगचा रेड झोन
Satara : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचं कऱ्हाडात निधन

कऱ्हाड विमानतळाच्या कलर कोडींग नकाशा तयार असूनही जाहीर होत नव्हता. त्याबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी परवा दिल्ली येथे केंद्रीय विमान मंत्री ज्योतीरादित्य सिंदीया यांची भेट घेवून चर्चा केली. विमानतळ प्राधीकरणाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आमून दिल्या आमदार चव्हाण यांच्यासोबत कऱ्हाडचे नगरसवेक, बांधकाम व्यवसायिक होते. त्यामुले दोन दिवसात विमानतळ प्राधीकरणाने कलर कोडींग नकाशा आज प्रसिद्ध केला. त्याची प्रत पालिकेस प्राप्त झाली आहे. नकाशात अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. त्यानुसार तीन किलोमीटरचे हवाई अंतर कायम ठेवले आहे. नकाशा नुसार निम्म्या कऱ्हाडवर रेड झोन आहे. कलर कोडींगचे पाच टप्पे आहेत. त्यात रेड झोन म्हणजेच लाल रंग, जांभळा, निळा, पिवळा व हिरव्या रंगानुसार टप्पे आहेत. विमानतळ धावपट्टीच्या केद्र बिंदूपासून तीन किलोमीटरवर रेड झोन आहे. त्यात कोणतेही बांधकाम करायचे झाल्यास त्यांना विमानतळ प्राधीकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

निम्म्या कऱ्हाडवर विमानतळाच्या कलर कोडिंगचा रेड झोन
Satara : सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचं जबरदस्त वर्चस्व

त्यासाठी संबधितांनी karadnoe@gmail.com या इमेलवर अर्ज करून विमानतळ प्राधीकरणाची परवानगी घेणे सक्तीचे आहे. लाल रंग वगळात अन्य कोणत्याही रंगाच्या भागात विमानतळ प्राधीकरणाच्या ना हरकत दाखल्याशिवाय तीस मीटर म्हणजे १०० फुटांचे बांधकाम करता येणार आहे. त्या भागात शहरातील बुधवार पेठेचा काही भाग, कार्वे नाका परिसर, वाखाण रस्ता, मंगळावर पेठेचा मोठा भाग रोड झोनमधून वगळला आहे. तेथील तीस फुटापर्यंतच्या बांधकामास विमानतळ प्राधीकरणाच्या नाहरकत किंवा परवनगीची गरज नाही. विमानतळ प्राधीकरणाने जाहीर केलेल्या कलर कोडींग नकाशाची माहिती देण्यासाठी शहरातील बांधकाम व्यवसायिकांसह अभियंत्याना पालिका ट्रेनिंग देणार आहे, त्यासाठी बैठक उद्या (मंगळवारी) होणार आहे, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यंनी स्पष्ट केले.

निम्म्या कऱ्हाडवर विमानतळाच्या कलर कोडिंगचा रेड झोन
Satara : राष्ट्रवादीला धक्का; सेनेच्या महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना रोखलं

असा रेड झोन

विमानतळ प्राधीकरणाने कलर कोडींग नकाशा जाहीर केला आहे. त्यामध्ये रेड झोनमध्ये कऱ्हाड शहरातील सोमवार, शुक्रवार पेठ, पूर्णतः समाविष्ठ झाले आहे. मंगळवार पेठतील कमळेश्वर मंदीर, स्मशानभूमीचा रस्ता, टाऊन हॉलचा कोपरा, पालिकेची इमारत, सुपर मार्केटपासून कोल्हापूर नाक्यापर्यंतचा भाग रेड झोनमध्ये आहे. त्यासोबत विमानतळ धावपट्टीपासून तीन किलोमीटपर्यंत पाटण बाजूलाही रेड झोन आहे. वरूंजीसहीत मुंढे, विजयनगर, पाडळी, केसे, सुपने आदी गावे १०० टक्के तर गोटे गावचा निम्मा भाग रेड झोनमध्ये आहे. त्यांना नाहरकत दाखल्यासाठी दिल्ली येथील परवानगी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com