esakal | दमदार पावसामुळे उत्तर-मांड धरण पूर्ण भरून वाहिले; शेतकरी आनंदी
sakal

बोलून बातमी शोधा

दमदार पावसामुळे उत्तर-मांड धरण पूर्ण भरून वाहिले; शेतकरी आनंदी

सध्या पडत असलेल्या दमदार पावसामुळे हे धरण पूर्ण भरून वाहू लागले असल्याने या परिसरातील सर्व शेतकरी व इतर लोक आनंदी झाले आहेत.

दमदार पावसामुळे उत्तर-मांड धरण पूर्ण भरून वाहिले; शेतकरी आनंदी

sakal_logo
By
कृष्णात साळुंखे

चाफळ (सातारा): शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी वरदाई ठरलेले गमेवाडी (चाफळ) येथील महत्त्वकांक्षी उत्तर-मांड धरण दमदार पावसाने पूर्ण भरून वाहू लागले आहे. चाफळ विभागापासून ते उंब्रज पर्यंतच्या जवळपास अडीच हजार एकर शेती सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान या वरदाई व महत्त्वकांक्षी ठरलेल्या गामेवाडी(चाफळ) येथील उत्तर-मांड मध्यम प्रकल्पामुळे दरवर्षी भागत असते, सध्या पडत असलेल्या दमदार पावसामुळे हे धरण पूर्ण भरून वाहू लागले असल्याने या परिसरातील सर्व शेतकरी व इतर लोक आनंदी झाले आहेत.

हेही वाचा: Rain Update : सातारा, महाबळेश्वर, पाटणात मुसळधार

आजमितीस उत्तर- मांड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८७५ मिमी.एवढा पाऊस पडला आहे. ०:८८टी एमसी एवढी पाणी साठवण क्षमता या धरणाची आहे, तर ६८७:५० मीटर एवढी पाणी संचय पातळी आहे. धरणाची लांबी १ हजार ४२० मीटर तर उंची ४४:४५ मीटर आहे. या धरणाचे बांधकाम सन १९९७ साली सुरू होऊन आज ते पूर्णत्वास गेले आहे. या प्रकल्पात ६२५ एकर जमीन बाधित झाली असल्याने नाणेगाव व माथनेवाडी ही दोन गावे पूर्ण पुनर्वसित झाली आहेत. उत्तरमांड मध्यम प्रकल्पातून 2590 घ.फू.प्र.से. पाणी सांडव्यावरून नदी पात्रात वाहत असल्याने काठच्या सर्व लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात प्रवेश करू नये, असा इशारा पाटण प्रांताधिकारी यांनी दिला आहे.

हेही वाचा: सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड चौकातील शीतल हॉटेलला आग

हा प्रकल्प पूर्ण होण्याआधी येथील शेती ही पूर्ण कोरडवाहू शेती म्हणून परिचित होती. पुर्वी या शेतजमिनीत खरिपाची व रब्बी हंगामातील सर्व कोरडवाहू पिके घेतली जात होती. मुबलक जलाशय म्हणून प्रसिद्ध असलेला हा महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याने या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील हजारो एकर शेतजमीन सिंचनाने हिरवीगार बागायती शेती निर्माण करून अनेक शेतक-यांचे जीवनमान प्रगत केले आहे. या प्रकल्पापासून ते उंब्रज पर्यंतच्या लाभ क्षेत्रात उत्तर-मांड नदीवर ठिकठिकाणी वरदाई असे अकरा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून लाभक्षेत्रातील शेतजमीन सुजलाम-सुफलाम केली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपआपल्या शेतीमध्ये आधुनिक व नवनवनवीन शेतीतंत्रज्ञान वापरून अनेक नगदी पिकांचे विक्रमी उत्पादन पिकवून आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत.

हेही वाचा: जिल्ह्यात 20 बाधितांचा मृत्यू; सातारा, क-हाडसह खटावात चिंता

सध्या पडत असलेल्या दमदार पावसामुळे या धरणांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली असल्याने येथील शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी वरदाई मदत होईल हे नक्की. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने आज सकाळी काही सुवासिनी महिलांनी खणा-नारळाने पाणी साठ्याची ओटी भरून औक्षण केले आहे. नदी पात्रामध्ये पाणी वाढल्याने काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम; काेयनेसह महाबळेश्वरात जाेर

माथणेवाडी येथील उर्वरित चौदा घरांचे खास बाब म्हणून पाठवलेला प्रस्ताव आजही प्रलंबित आहे, या बाबीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी आतातरी गांभीर्याने लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावल्यास, माथणेवाडीतील या लोकांचा हा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यास धरणाचे अठरा फुटी वक्र दरवाजे बंद करून आणखी धरणामध्ये अठरा फुटाने पाणीपातळीत वाढ होवु शकते.

- आबासो थोरात, चाफळ -शेतकरी

loading image