esakal | संस्कृतीकेच्या प्रदर्शनातून मिळाले दोन हजार नवीन शब्द
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृतीकेच्या प्रदर्शनातून मिळाले दोन हजार नवीन शब्द

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना सकारात्मक करण्यासह त्यांची मानसिकता बळकट व्हावी, यासाठी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक होत आहे.

संस्कृतीकेच्या प्रदर्शनातून मिळाले दोन हजार नवीन शब्द

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): येथील शिक्षण मंडळाच्या संस्कृतीका संस्कृत संशोधन केंद्रातर्फे कालिदास व संस्कृत दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या होत्या. त्या तयार केलेल्या वस्तूमधून दोन हजार संस्कृत शब्दांचा संग्रह शिक्षण मंडळाला मिळाला. तो संस्थेला प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्यापर्यंत पोचविण्यात यश आले. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना सकारात्मक करण्यासह त्यांची मानसिकता बळकट व्हावी, यासाठी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

संस्थेच्या चारही शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी सहा प्रकारच्या ऑनलाईन वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या. त्यात विद्यार्थ्यांच्या कलागुंणाना वाव देणाऱ्या त्यांनी तयार केलेल्या संस्कृतीमधील नावांच्या वस्तूचे प्रदर्शनाची सध्या चर्चा रंगते आहे. विद्यार्थ्यांसाठी स्तोत्र पाठांतर, सुभाषिते पाठांतर, संस्कृत कथाकथन स्पर्धांसह सुभाषितांचे भरतनाट्यमच्या मुद्रांतून सादरीकरण अशी स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला आणि अध्ययनाला कृतीची जोड मिळाली यासाठी विविध विषय शोधण्यात आले. विविध वस्तू जमा करून त्यांची संस्कृत नावे गोळा केली गेली. घरात विषय कोपरे मांडले गेले. त्यात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

हेही वाचा: सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

संस्कृतिकेच्या समनवयिका माधुरी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसादही मिळाला. विद्यार्थ्यांच्या विषयाला मर्यादा नव्हत्या. आजूबाजूच्या लोकांना प्रदर्शन पाहिले. त्यातून घराघरात संस्कृत शब्द पोचले पाहिजे, याच उद्देशाने प्रदर्शन १०० पैकी ७० विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संस्कृतमधील साहित्य संसकृतिकेकडे जमा केले. त्याचेच प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शन संस्कृतिकेत मांडून सर्वांसाठी खुले ठेवले होते. दोन हजार शब्दांचा संग्रह उपकरणांच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोचविला. तो विद्यार्थ्यांपर्यंत पोचतो आहे.

हेही वाचा: सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

जे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांचाही विचार करून त्यांच्या विषय कोपऱ्याच्या फोटोंचा संग्रह करून प्रेझेंटेशनच्या माध्यमातून याठिकाणी दाखवला जातो आहे. त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रदर्शन पोचवले जात आहे. संस्कृत शिक्षिका सौ. सामक, पल्लवी भोसले, कांचन पवार, गौरी कुलकर्णी, प्रांजली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले आहेत. शिक्षण मंडळाचे  सचिव चंद्रशेखर देशपांडे यांच्या हस्ते उद्धघाटन झाले. अनघा परांडकर यांनी नियोजनासाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी चैतन्य जोशी यांचेही सहकार्य मिळाले.

हेही वाचा: सातारा जिल्हा बॅंकेबाबतचा निर्णय लवकरच !

कोरोनामुळे मोठी कठीण स्थिती आहे, त्यातून विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचाराला वाव मिळावे, यासाठी संस्कृत शब्दातील प्रकल्प तयार करण्याचे आवाहन केले त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने दोन हजार शब्दांचा सग्रंह संस्थेकडे झाला आहे.

- माधुरी कुलकर्णी, संस्कृतिका प्रकल्प समन्वयक

loading image
go to top