धक्कादायक! तीन वर्षाच्या मुलाला शेतात ओढत नेऊन बिबट्यानं केलं ठार I Leopard Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest Department

ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं उचलून नेलं आणि..

धक्कादायक! तीन वर्षाच्या मुलाला शेतात ओढत नेऊन बिबट्यानं केलं ठार

कऱ्हाड / विंग (सातारा) : ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं (Leopard) उचलून नेलं. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथेच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली. आकाश पावरा (वय 3) असं त्या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळं त्या परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झालीय.

घटनास्थळी वनविभागाचे (Forest Department) कर्मचारी दाखल झाले असून ग्रामस्थांनी त्यांच्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा न लावल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. त्या परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे.

हेही वाचा: आमदार शिंदे-रांजणे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत

त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. मात्र, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्यात न आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यापूर्वीही येणके गावामध्ये बिबट्या उसाच्या शिवारात आला होता. त्यावेळीही हे प्रकरण मोठे गाजले होते.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेबांचं 'महानाट्य' सातारकरांनी आजही ठेवलंय जपून

loading image
go to top