Sugarcane Trolley Pin Snaps, Claims Life of Two-Wheeler Rider
Sakal
सातारा
दुर्दैवी घटना! उसाच्या ट्रॉलीखाली दबून दुचाकी चालकाचा मृत्यू; म्हसवडनजीक अपघात, अचानक पीन निघाली अन्..
Two wheeler rider crushed under sugarcane trolley: उसाच्या ट्रॉलीखाली दबून दुचाकी चालकाचा मृत्यू; म्हसवडजवळील अपघातात सूरज माने ठार
म्हसवड : येथून जवळच कुकुडवाड- मायणी रस्त्यावर ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरची पीन निघून जोडलेल्या दोन ट्रॉली अचानक उलटल्या. त्याचवेळी मागून येणारा दुचाकीचालक त्याखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शनिवारी रात्री झालेल्या या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव सूरज संजय माने (वय ३०, रा. म्हसवड) असे आहे.

