दहिवडी : दहिवडी- नातेपुते, तसेच दहिवडी- राणंद या दोन रस्त्यांवर दोन ठिकाणी आज झालेल्या अपघातांत शेवरी व दहिवडीतील दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!.मिळालेल्या माहितीनुसार, बबन भगवान चव्हाण (वय ६०, रा. मोही) हे शिखर शिंगणापूरकडून दहिवडीकडे येत होते, तर सूरज अनिल फासे (वय ३५, रा. दहिवडी) हे दहिवडीकडून शिखर शिंगणापूर रस्त्यावर असणाऱ्या वावरहिरे गावच्या हद्दीतील माणगंगा ॲग्रो कंपनीत कामासाठी जात होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडीतील शिंगणापूर फाट्यापासून पुढे शिखर शिंगणापूर रस्त्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. .या अपघातात सूरज हे गंभीर जखमी झाले, तर बबन चव्हाण किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ १०८ क्रमांकावर संपर्क साधून आरोग्य यंत्रणेला या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर दहिवडी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून सूरज फासे यांना रुग्णालयात नेण्यात आले..मात्र, उपचारापूर्वीच सूरज यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बबन चव्हाण यांच्यावर उपचार करून पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. बबन चव्हाण यांनी अविचाराने, चुकीच्या बाजूने गाडी चालवून सूरज फासे यांच्या गाडीला धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार सूरज यांचे बंधू आशिष फासे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे..Success Story: बोअरमधून पंप काढण्याचे बनविले मशिन; जुगाडातून उभारला कोटींचा उद्योग, धनाजी सुर्वे यांची भरारी!. दरम्यान दुसरी घटना दहिवडी - राणंद रस्त्यावरील मुळीकवस्ती नजीकच्या वीटभट्टीजवळ घडली आहे. संपत जोतिराम गलंडे (वय ४०, मूळ रा. सोकासन, सध्या रा. शेवरी) हे दहिवडीकडे येत असताना रस्त्याच्या कडेला पडून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोन्ही घटनांचा सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.