esakal | खटावातील विखळेत वीज उपकेंद्राला आग; तालुक्यातील बारा गावं अंधारात!

बोलून बातमी शोधा

Power Station

खटावातील विखळेत वीज उपकेंद्राला आग; तालुक्यातील बारा गावं अंधारात!

sakal_logo
By
संजय जगताप

मायणी (सातारा) : विखळे (ता. खटाव) येथील वीज उपकेंद्रात अचानक आग लागून ट्रान्स्फॉर्मर जळून खाक झाला. महावितरणचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले असून विखळे, कलेढोण परिसरातील 12 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला.

विखळे येथील वीज उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरला अचानक आग लागली. त्यामध्ये ट्रान्स्फॉर्मर जळून खाक झाला. त्यामुळे परिसरातील विखळे, कलेढोण, गारळेवाडी, गारुडी, तरसवाडी, मुळीकवाडी, पाचवड, औतडवाडी, ढोकळवाडी, पडळ, हिवरवाडी व कान्हरवाडी अशा 12 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. आग व धुराचे लोट आकाशात झेपावू लागताच परिसरातील लोकांनी गर्दी केली. आग विझविण्यासाठी विटा नगरपालिका व सह्याद्री साखर कारखान्याचे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे पाऊण तासात यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

'गरीब कल्याण'मधून 80 कोटी लोकांना मोफत धान्य; उदयनराजेंकडून मोदींचं कौतुक

दरम्यान, महावितरणचे सात ते आठ कर्मचारी यांनी अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. आगीची माहिती मिळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हनुमंत ढोक, उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी आणि मायणीचे शाखा अभियंता विशाल नाटकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान काल वादळी वारा व पावसामुळे दुपारी अडीच वाजता खंडित झालेला वीजपुरवठा पहाटे तीन वाजता सुरू करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. त्यामुळे सलग दोन दिवस या बारा गावांतील नागरिकांना अंधाराचा व उकाड्याचा सामना करावा लागला.

VIDEO : नगरसेवकांचं असंही दातृत्व; 'विलगीकरणा'साठी दिलं मोफत हॉटेल, जेवणाचीही केली सोय

ट्रान्स्फॉर्मरमधील अंतर्गत बिघाडाने बुशिंग जवळून आग भडकली. सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. दोन तासांत वीजपुरवठा सुरळीत करू.

-विशाल नाटकर, शाखा अभियंता, मायणी

Edited By : Balkrishna Madhale