Satara News : अवकाळीने द्राक्ष बागांचे बारा कोटींचे नुकसान

माण तालुक्यातील स्थिती : बहरलेल्या बागेवर कुजव्याचा प्रादुर्भाव, उत्पादक शेतकरी हवालदिल
satara
satarasakal

म्हसवड : अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे दुष्काळी माण तालुक्याच्या पूर्व देवापूर, पळसावडे, काळचौंडी, बनगरवाडी आदी गावांच्या परिसरातील सुमारे शंभराहून अधिक संख्येतील द्राक्ष घडांनी वेली बहरलेल्या बागेवर कुजव्या रोगाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सुमारे बारा कोटी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दुष्काळी माण तालुक्याच्या अल्प पर्जन्यमान असलेल्या पूर्व भागातील पळसावडे, काळचौंडी, बनगवाडी, शेनवडी, जांभुळणी, पळसावडे, देवापूर, ढोकमोडा म्हसवड आदी गावांच्या परिसरात पाणी टंचाईवर मात करून ठिबक सिंचनावर द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी जोपासल्या आहेत.

satara
Satar : विडणीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये सामना

गेल्या आठवड्यात व त्यापूर्वीही या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे याबरोबरच सातत्याने टिकून राहिलेले ढगाळ हवामान व दाट धुके याचा परिणाम द्राक्ष घडातील मणीवर होऊन त्यावर कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. प्रत्येक घडातील मण्यास तडे जाऊ लागले व हळूहळू मणी भरलेले द्राक्षाचे घड काळे पडून त्यातील द्राक्ष मण्याचा सडा बागेत पडून वेलीवर द्राक्ष घडांच्या फक्त काटक्या शिल्लक राहण्याचे प्रकार घडले.

कुजवा रोगामुळे बागेतील वेलीवर बहरून गेलेले द्राक्षाचे घड नाहीसे होऊन कुजके द्राक्ष मण्यांचा बागेतील जमिनीवर सडा पडल्यामुळे बागेत व बागेच्या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे.जमिनीवर सडा पडलेले कुजके द्राक्ष मणी बागेबाहेर काढून फेकून देण्यासाठी अतिउग्र दुर्गंधीमुळे मजूरही कामास येण्यास धजावत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

अवकाळी पावसाचा तडाखा सलग तीन वर्षे बसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा उपटून टाकण्याच्या मनःस्थितीत आहेत.यंदाच्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे संबंधित तलाठी कृषी अधिकारी यांनी तातडीने जरी सुरू केले आहेत. मात्र, पीक विम्याची रक्कम मंजूर होते की नाही? झालीच तर ती किती मिळणार? या चिंतेत शेतकरी आहेत.

satara
Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरुन प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..; वाहतुकीत केलाय बदल

यंदा द्राक्ष बागेत भरघोस द्राक्ष घड लागले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतरच्या हवामानामुळे बागेत कुजव्या रोगाची लागण झाली. काळे पडलेले घड मजूर लावून काढून टाकली. औषधेही मारली. पुन्हा अवकाळीचा तडाखा बसल्याने द्राक्षघड कुजून बागेत कुजक्या मण्यांचा सडा पडल्याने उग्र वासाची दुर्गंधी पसरली आहे. दोन एकर क्षेत्रात किमान १७ टन द्राक्ष उत्पादनातून बारा ते तेरा लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, अपेक्षांवर पाणी पडले. तीन वर्षे अवकाळी पावसामुळे बागांचे नुकसान होत असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे.

- सुशांत बाबर

satara
Satara News : साताऱ्यात भाजपचा विजयोत्‍सव

शेतकऱ्याचे नाव बागेचे क्षेत्र नुकसान रक्कम

  • सुशांत बाळासाहेब बाबर दोन एकर २४ लाख

  • ज्ञानदेव रामू बाबर दीड एकर १८ लाख

  • शामराव रामू बाबर एक एकर १२ लाख

  • बाळासाहेब नारायण यादव अडीच एकर २० लाख

  • तुकाराम रामू बाबर तीन एकर ३२ लाख

  • शहाजी बाबर तीन एकर ३५ लाख

  • शामराव बाबर एक एकर १० लाख

  • बापू माने दोन एकर २१ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com