Udayanraje Bhosle: घराण्‍याचे वलय तरीही सातारकर विकासापासून वंचित आणि उपेक्षितच, एमआयडीसी कोणामुळे अडचणीत आली?

घराण्‍याचे वलय असतानाही सातारकर विकासापासून वंचित आणि उपेक्षितच
Satara Development
Satara Developmentsakal

सातारा - सर्व सत्तास्‍थाने हाती असताना, घराण्‍याचे वलय असतानाही सातारकर विकासापासून वंचित आणि उपेक्षितच राहिले. प्रत्‍येकवेळी त्‍यांनी संधी मागितली. सातारकरांनी त्‍यांना ती दिली. मात्र, साताऱ्याचा विकास झाला नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा नामोल्लेख न करता केली. दरम्यान, त्‍यांना किती संधी द्यायची ?

कामांची आणि वचनांची पूर्तता होत नसेल तर कोणालाही पदावर राहण्‍याचा अधिकार नसून साताऱ्याचा विकास कोणामुळे रखडला, याचा विचार सातारकरांनी करणे आवश्‍‍यक असून, याबाबत त्‍यांना प्रश्‍‍न विचारणे आवश्‍‍यक असल्‍याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Satara Development
Satara : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु झालीच पाहिजे; बाळासाहेब थोरात

सातारा विकास आघाडीच्‍या सातारा विकास अभियानाच्‍या प्रारंभप्रसंगी सदरबझारमध्‍ये आयोजित सुसंवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनोज शेंडे, किशोर शिंदे, संजय पाटील, वसंत लेवे, रंजना रावत, बाळासाहेब गोसावी, निशांत पाटील, सुजाता राजेमहाडिक, स्‍मिता घोडके, माजी सभापती सुनील काटकर, संग्राम बर्गे, शिरिष चिटणीस, चंद्रकांत पाटील, काका धुमाळ, प्रीतम कळस्‍कर तसेच नागरिक उपस्‍थित होते.

Satara Development
Satara Crime: 'सूरज्याला माझ्या समोर आणा, नाहीतर जिवंत सोडणार नाही'; शेअर मार्केटच्या पैशावरून जिवे मारण्‍याची धमकी

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्‍यानंतर उदयनराजेंच्‍या हस्‍ते वचनपूर्तीचा सचित्र कार्यवृत्तांत प्रकाशित करण्‍यात आला. यानंतर नागरिकांनी रोजगार, आरोग्‍य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांबाबत मते मांडली. मते ऐकल्‍यानंतर उदयनराजे म्‍हणाले, ‘महाविद्यालयीन शिक्षण संपवून साताऱ्यात परतलो आणि जनतेच्‍या अडचणी जाणून घेत मी सक्रिय झालो. नगरसेवक झाल्‍यानंतर प्रत्‍येक टप्‍प्‍यावर मी वस्‍तुस्‍थिती मांडली. यापूर्वी आपण अनेकांना निवडून दिले. काय केले त्‍यांनी? विकासकामे करताना सुसंवाद साधणे महत्त्‍वाचे असते.

मर्यादा असतानाही अनेक विकासकामे मार्गी लावली. मला लोकांची कामे करण्‍यात रस आहे. मी कधीही श्रेयवादात अडकलो नाही. ज्‍याला श्रेय घ्‍यायचे आहे, त्‍यांनी ते घ्यावं. आपल्‍याला काम करता येत नसेल, तर दुसरा करत असेल तर त्‍यात अडथळा आणू नये, एवढेच माझे म्‍हणणे आहे,’ असे म्‍हणत त्‍यांनी नाव न घेता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यावर टीका केली.

Satara Development
Satara Rain Update : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; जिल्ह्यात 17 टक्केच पाऊस, फक्त 30 टक्के पेरण्या पूर्ण

नाव ठेवायला अक्कल लागत नाही. त्‍यांनी जर जनतेची कामे केली असती, तर सातारा विकास आघाडीची गरजच लागली नसती. दुसऱ्यावर आरोप करण्‍याऐवजी आपल्‍याकडून कामे का झाली नाहीत, याचा त्‍यांनी विचार करणे आवश्‍‍यक आहे. सत्तेचा मला फरक पडत नाही. लोकांची कामे माझ्‍यासाठी महत्त्‍वाची. यानंतर त्‍यांनी शाहूपुरी, शाहूनगरसह इतर विस्तारित भागातील विकासकामांची माहिती देत विकासासाठी एकत्र येण्‍याचे आवाहन नागरिकांना केले.

एमआयडीसी कोणामुळे अडचणीत आली?

सातारा आणि नगर या दोन्‍ही एमआयडीसी एकाचवेळी सुरू झाल्‍या. नगर एमआयडीसी विस्‍तारली. मात्र, सातारा एमआयडीसी अडचणीत का आली?, कशामुळे?, कोणामुळे?. उद्योजकांना दमदाटी करणाऱ्यांना हे पाठबळ देतात, असा आरोप करत विकास कोणामुळे रखडला, विचार करा सातारकरांनो, त्‍याबाबत तुम्‍ही त्यांना प्रश्‍‍न विचारणार आहात का? असा सवाल उदयनराजेंनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com