कऱ्हाड, साताऱ्यात उद्या लसीकरण बंद; जिल्‍हाधिकाऱ्यांनी केलं 'हे' आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

कऱ्हाड, साताऱ्यात उद्या लसीकरण बंद; जिल्‍हाधिकाऱ्यांनी केलं 'हे' आवाहन

सातारा : जिल्ह्यात कोविड (Corona) लसीकरणाची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व नियमानुसार सुरू आहे. सद्यस्थितीत लस पुरवठा प्रक्रियेवर संपूर्ण देशात ताण आला आहे. त्यामुळे लस पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी शेखर सिंह (District Collector Shekhar Singh) यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या लसीचा तुटवडा असल्यामुळे उद्या (शुक्रवार) सातारा आणि कऱ्हाड शहरातील काही कोरोना सेंटरवर (Corona Center) लसीकरण (Vaccination) होणार नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Vaccination Closed Tomorrow At Corona Center In Satara And Karad Satara Marathi News)

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लस प्रक्रियेवर ताण आला आहे. शासनाकडून सर्व बाबींचा विचार करून हा साठा पुरवण्यात येत आहे. जिल्ह्यात आलेला साठा प्रत्येक आरोग्य केंद्र व शहरांमध्ये असणारे सक्रीय रुग्ण व लोकसंख्या याचा विचार करून प्रत्येक केंद्रनिहाय लसीचे वाटप केले जाते. यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. मात्र, त्या परिसरातील रुग्ण प्रमाण व लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतले जाते ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीचे वाटप होत आहे. सद्यस्थितीत 45 वर्षे वरील लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. या वयोगटातील लसीकरण सुरू आहे, त्याशिवाय अन्य लोकांनी केंद्रांवर गर्दी करू नये. तसेच लस अगोदर मिळण्यासाठी डॉक्टरांवर कोणताही दबाव आणू नये, तसे केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्‍हाधिकारी सिंह यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: धक्कादायक! गर्भवतींसह मुलांमध्ये संसर्गाचा धोका; 'सिव्हिल'मध्ये सरसकट सर्वांची एकाच ठिकाणी तपासणी

कऱ्हाड शहरात लसीचा तुटवडा असून कोरोना लस (Vaccination) घेणाऱ्यांची नोंदणी पालिकेने सक्तीची केली आहे. त्यामुळे पालिकेकडे नोंदणी झालेल्या 50 जणांना पालिकेने फोन करून कल्पना दिली आहे. तेवढ्याच लोकांना कोव्हॅक्सिनची दुसरी लस घेण्यासाठी पालिकेने बोलावले आहे. तर साताऱ्यातही लसीचा तुटवडा असल्याने बहुतांश लसीकरण केंद्रं (Vaccination Center) बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या साताऱ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी लसीकरण वाढविण्याची मागणी केली आहे, त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी देखील प्रतिसाद देत लसीकरण वाढविले जाईल, अशी ग्वाही दिलीय.

दिनांक 20 मे : पहिला डोस : 5,97,845

दुसरा डोस : 1,11,772

एकूण लसीकरण : 7,09,617

आजचे लसीकरण : 7,609 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

1828 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज सायंकाळपर्यंत 1828 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमुने - 659295

  • एकूण बाधित - 143061

  • घरी सोडण्यात आलेले - 120646

  • मृत्यू - 3328

  • उपचारार्थ रुग्ण - 19082

कऱ्हाडकरांनो! तुम्हाला फोन आला असेल, तरच गुरुवारी लसीकरणासाठी जा

Vaccination Closed Tomorrow At Corona Center In Satara And Karad Satara Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top