esakal | कोविड रुग्णांना त्वरित व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन द्या; साताऱ्यात वंचित आघाडी आक्रमक

बोलून बातमी शोधा

Vanchit Bahujan Aghadi
कोविड रुग्णांना त्वरित व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन द्या; साताऱ्यात वंचित आघाडी आक्रमक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोविड बाधितांवरील (Covid Patient) उपचारांसाठी शासनाने आवश्‍यक त्या सर्व सुविधा उभारण्याच्या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. (Vanchit Bahujan Aghadi Demand To Provide Health Facilities To Covid Patient)

या आंदोलनात चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, गणेश भिसे, संदीप कांबळे आदी सहभागी झाले होते. जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असून त्या तुलनेत आवश्‍यक असणाऱ्या आरोग्य सुविधा उभारण्यात येत नसल्याचा आरोप वंचितच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. सध्या अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर तसेच ऑक्‍सिजन सुविधा असणारे बेड मिळत नसून सध्या त्याचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे.

बेड हवाय! एक फाेन फिरवा; युवक कॉंग्रेस येईल तुमच्या मदतीला

आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत असतानाच लोकप्रतिनिधींचा मात्र आढावा बैठकींचा धडाका सुरू आहे. या बैठकांत काय चर्चा होते आणि काय उपाययोजना राबविण्यात येतात, हा सातारकरांना पडलेला प्रश्‍न आहे. सध्याच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Vanchit Bahujan Aghadi Demand To Provide Health Facilities To Covid Patient