
सदर स्कूल व्हॅन ही गॅसवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
School Van : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला भीषण आग; गाडीत होते दहा विद्यार्थी
लोणंद (सातारा) : वाठार काॅलनी ( ता. खंडाळा) येथील एका विद्यालयातील मुलं शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅननं (School Van) अचानक पेट घेतल्याची घटना आज (ता. 25) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लोणंद-शिरवळ रस्त्यावर शेडगेवाडी फाट्या नजीक घडली.
दरम्यान, प्रसंगावधान राखून चालकानं सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढलं. त्यामुळं व्हॅनमधील शालेय विद्यार्थांना कसलीही इजा झाली नाही. मात्र, आगीत स्कूल व्हॅन जाळून पूर्णपणे खाक झाली.
सदर स्कूल व्हॅन ही गॅसवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या व्हॅनमध्ये शेडगेवाडीतील आठ ते दहा विद्यार्थी (Students) होते. व्हॅननं अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकानं सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, या आगीत स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झालीये. या स्कूल व्हॅनचे चालक हा वाठार काॅलनीमधील विद्यालयातील शिपाई असल्याचं समजतं आहे. या अपघातानं स्कूल व्हॅनच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.