
Kumthe villagers protest against solar project; forest officials expelled from grazing land.
Sakal
आसरे : महावितरण कंपनीच्या वतीने कुमठे (ता. कोरेगाव) येथील ३२ एकर गायरानात मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषीवाहिनी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यास गावाचा तीव्र विरोध असूनही वन विभागातर्फे तेथील वृक्ष सर्वेक्षण सुरू होते. त्याबाबत समजताच संतप्त ग्रामस्थांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावत पुन्हा पाऊल न ठेवण्याचा इशाराही दिला.