
Karanjkhop School Locked by Villagers Over Teachers’ Late Arrival; Heated Exchange Reported
Sakal
पिंपोडे बुद्रुक : करंजखोप (ता. कोरेगाव) येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. शिक्षक वेळेवर न येणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे आणि बायोमेट्रिक हजेरी मशिन व सीसीटीव्ही यंत्रणा बंद ठेवणे यामुळे ग्रामस्थांनी शिक्षकांना धारेवर धरले.