तहसीलदारांच्या मध्यस्थीने हर हर महादेवच्या जयघाेषात उघडले क्षेत्र महाबळेश्वरातील मंदिर

तहसीलदारांच्या मध्यस्थीने हर हर महादेवच्या जयघाेषात उघडले क्षेत्र महाबळेश्वरातील मंदिर

भिलार (जि. सातारा) : अखेर शासनाच्या आदेशानुसार आज (साेमवार) क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानने तब्बल आठ महिन्यांनंतर मोकळा श्वास घेतला. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्ट यांच्यात मंदिर उघडण्यावरुन काही काळ तणाव निर्माण झाला. परंतु तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर आज (साेमवार) सकाळी क्षेत्र महाबळेश्वरमधील सर्व देव देवतांची मंदिरे स्थानिक भाविकांससह पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. ग्रामस्थांनी आलेल्या भाविकांचे फुलांचा वर्षाव करून जल्लोषी स्वागत केले.

कोरोनामुळे देशातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे गेले आठ महिन्यांपासून शासनाने बंद केली होती. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. क्षेत्र महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांवर येथील सर्व व्यावसायिक व आर्थिक जीवनमान अवलंबून आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून येथील सर्व व्यवसाय व व्यवहार ठप्प झाल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती. मुख्यमंत्र्यांनी मंदिरे खुली करण्याचे आदेश दिल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

गोंदवलेतील दर्शनासाठी नावनोंदणी आवश्यक; ऑनलाइन दर्शनाचीही मुभा
 
आज (साेमवार) सकाळी सर्व ग्रामस्थ ऐकत्र येवून कुलूपबंद असणारी मंदिरे खुली करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने मंदिरे खुली करण्यास नापसंती दर्शवली. त्यामुळे काही काळ ग्रामस्थ व ट्रस्ट अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. ग्रामपंचायतीने ट्रस्टला पत्र दिले तरीही ते खुली करण्यास तयार नव्हते. 

अखेर तहसीलदार सुषमा पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत शासकीय नियम, आदेश आणि ग्रामस्थांची अर्जव सांगितल्याने तहसीलदारांनी मंदिरे खुली करण्याचे सांगितल्यानंतर सर्व मंदिरे खुली करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिरा सह सर्व देव देवतांच्या मंदिरा समोर आलेल्या सर्व भाविक व पर्यटक यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.

पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते 

माजी सरपंच प्रदीप कात्रट यावेळी म्हणाले, आठ महिन्यानंतर मंदिरे खुली झाल्याने आम्ही सर्व ग्रामस्थ व व्यावसायिक आनंदित असून सर्व शासकीय नियम सॅनिटायझर, मास्क याबाबतीत जागृत असून मास्क परिधान केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. याबराेबरच गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com