

Sunil Mane alleges multiple voting incidents in Karad North during the recent assembly elections.
Sakal
कऱ्हाड : रहिमतपूर येथील मतदार नोंदणी अधिकाऱ्याने तीन प्रभागात नाव असून, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तीन ठिकाणी त्यांनी मतदान केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केला. दरम्यान, कऱ्हाड उत्तर मतदारसंघात विधानसभेला १८ हजार दुबार मतदार नोंदणी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.