esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Voter list

बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.

बँक निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर; NCP, BJP कडून 'मास्टर प्लान' तयार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election 2021) मतदारांची अंतिम यादी (Voter list) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत १९६४ मतदार असून, १८ ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक कार्यक्रम (Election Program) जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. आता जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), काँग्रेस, शिवसेना व भाजपकडून (BJP) रणनीती आखली जाणार आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होत असून, सप्टेंबर महिन्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती आल्या होत्या. त्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, कायदेशीर बाबींमुळे त्यास विलंब झाला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालयाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्हा बँकेसाठी आता १९६४ मतदार राहणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातून ११ जागा निवडून द्यावयाच्या असून, यासाठी तालुकानिहाय मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा: शिवसेनेला कमी लेखण्याची चूक करु नका : उदय सामंत

सातारा तालुक्यात १४५, जावळी ४९, महाबळेश्वर ११, कऱ्हाड १४०, पाटण १०३, कोरेगाव ९०, खटाव १०३, माण ७४, खंडाळा ५१, वाई ५९, फलटण तालुक्यात १३१ मतदार आहेत. खरेदी विक्री संघ ११, कृषी प्रक्रिया २७, नागरी सहकारी बँका ३७४, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था २७२, औद्योगिक व विणकर संस्था मतदारसंघात ३२४ मतदार अशी एकूण १९६४ मतदारांची संख्या आहे. दरम्यान, पाच जागा राखीव असून, त्यासाठी १९६४ मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. यामध्ये महिला प्रतिनिधी दोन, अनुसूचित जाती-अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती/भटक्या जमाती अथवा विशेष मागासवर्गीय सदस्य प्रवर्गातून प्रत्येकी एक अशा तीन जागांचा समावेश आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढणार? दादांमुळे कार्यकर्ते 'चार्ज'

loading image
go to top