कऱ्हाडला पर्यावरणपूरक रांजणातून नागरिकांसाठी 'पाण्याची सोय'

सुहास जगताप यांचा उपक्रम; सोमवार पेठेतील अनेक सर्व कॉर्नरवर केली पिण्याच्या पाण्याची सोय
pot
potsakal

कऱ्हाड (सातारा) : येथील सोमवार पेठेत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुन्या काळातील रांजणाला आकर्षकपणे रंग देवून पर्यावरण पुर पाणपोई येथे उभारण्यात आली आहे. येथील नगरसवेक सुहास जगताप यांनी स्व:खर्चातून नागरीकांसाठी पाण्याची सोय केली आहेच. त्यासह त्याच रांजणावर पर्यावरणाचा संदेश त्यांनी दिला आहे.

pot
ठाण्याच्या सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा कऱ्हाडात निषेध

नगरसवेक जगताप यांनी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सामाजिक प्रबोधनाबरोबर मागील वर्षी त्यांनी कोरोना काळात स्व:खर्चाने आवश्यकतेनुसार सॅनिटाईज फवारणी केली. कडक लॉकडाऊनच्या नागरिकांना दूध, भाजी घरपोच दिली. सोमवार पेठेतील बिल्डिंगमध्ये शहरातील महत्वाचे फोन नंबरचे फलक लावले. त्यासह आजपासून त्यांनी वेगळाच उपक्रम हाती घेतला आहे. जुन्या काळातील घराघरांमध्ये रांजण सध्याच्या पिढीला माहित नाहीत. जुन्या काळातील रांजणाची नव्या पिढीला माहिती व्हावी यासह पाणीही गार मिळावे, ते पर्यावरम पुरक असावे, यासाठी त्यांनी रांजणांवर रंगकाम करून घेतले. त्याची अत्यंत देखणी पाणपोई केली.

pot
विनाशकारी भूकंपानंतर कोयना विभाग दुसऱ्यांदा 'शापित'

ती सोमवार पेठेतील रिकामी जागांसह सोमवार पेठेत प्रत्येक कॉर्नरला ठेवली आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये पिण्याचे पाणी रांजणामध्ये साठवले जायचे. मातीच्या रांजणात पाणी थंड राहते. रांजणाचा आकार मोठा असल्याने सुमारे २० ते ५० लिटर पाणी मावते.पाणी धारण क्षमतेनुसार ते वेगवेगळ्या आकाराचे असतात. नगरसवेक जगताप यांनी नवीन पिढीला रांजणाची माहिती व महत्व कळावे नागरिकांची तहाण भागावी यासाठी पाणपोई बसवली आहे. सोमवार पेठेत कोचिंग क्लासेससह अनेक मंदिरेही आहेत पेठेत शहरासह अन्य ठिकाणांहून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी रांजण बसवल्याचे नगरसवेक जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com