esakal | संकट! फलटणसह 40 गावांच्या पाणीयोजना अडचणीत; नीरा कालवा 15 दिवसांपासून बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Nira canal

फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याच्‍या पाणीयोजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहे.

संकट! फलटणसह 40 गावांच्या पाणीयोजना अडचणीत

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याच्‍या पाणीयोजना नीरा उजवा कालव्यावर (Nira canal) अवलंबून असून, कालवा बंद झाल्यानंतर १५ दिवसांपेक्षा अधिक काळ या सर्व पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) कार्यान्वित राहू शकत नाहीत. २१ जून रोजी कालवा बंद झाला असून, ६ जुलैला पुन्हा सुरू होणे अपेक्षित असताना कालवा सुरू न झाल्याने तालुक्याच्या बागायती पट्ट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Water Supply Scheme Of 40 Villages In Phaltan Taluka In Trouble Satara Marathi News)

फलटण शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणीसाठा मर्यादित असून, कालव्यात पाणी सोडले नाही तर पुढील आठवड्यात शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, तरडगाव, साखरवाडी, विडणी, कोळकी या मोठ्या गावांसह अन्य छोट्या गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना आगामी दोन-तीन दिवसांत अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोळकी गावात आताच तीन दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे.

हेही वाचा: कोयनेतील प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांकडे सादरीकरण

नीरा उजवा कालवा विभागाकडून १५ जुलैदरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १५ जुलै म्हणजे आणखी आठ दिवस कालव्यात पाणी सोडले जाणार नसल्याने तालुक्यातील ३५ ते ४० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर्षीच्या हंगामात तुटणारा ऊस, आता तुटलेल्या उसाचा खोडवा, जूनमध्ये झालेल्या उसाच्या लागणीसाठी आणि आता १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऊस लागणीसाठी तसेच चारा व खरिपातील अन्य पिकांसाठी कालव्याच्या पाण्याची तातडीने आवश्यकता असताना कालवा १५ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याने बागायती पट्ट्यातील शेतकरी धास्तावला आहे.

हेही वाचा: सातारा पालिकेतील टेंडर प्रक्रियेत 'गोलमाल'

दोन दिवसांत पाणी सोडा

वीर धरणात सुमारे ४५ ते ५० टक्के पाणी उपलब्ध आहे. तालुक्याच्या वाट्याचे उन्हाळी हंगामाचे पाणी शिल्लक असल्याने नीरा उजवा कालवा विभागाने तातडीने नियोजन करून आगामी एक-दोन दिवसांत नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामपंचायत क्षेत्रातून होत आहे.

Water Supply Scheme Of 40 Villages In Phaltan Taluka In Trouble Satara Marathi News

loading image