esakal | वीर धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बुधवारी बैठक; लवकरच निघणार तोडगा
sakal

बोलून बातमी शोधा

वीर धरण

या बैठकीत नीरा-देवघर प्रकल्पचे कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा फलटण चे कार्यकारी अभियंता व वीर धरण ग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहे.

वीर धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बुधवारी बैठक; लवकरच निघणार तोडगा

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

खंडाळा (सातारा): वीर धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन व इतर सुविधा मिळणेबाबत उद्या मंगळवारी (ता.15) सप्टेंबर रोजी उपजिल्हा अधिकारी (पुनर्वसन) कीर्ती नलावडे यांनी वीर धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत नीरा-देवघर प्रकल्पचे कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा फलटण चे कार्यकारी अभियंता व वीर धरण ग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा: वीर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यातील वीर धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन व इतर सुविधा मिळण्यासाठी वीर धरण पुनर्वसन संघर्ष समिती, भोळी (ता.खंडाळा) यांनी 23 ऑगस्ट रोजी वाईचे प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले होते. यावर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सातारा यांनी ही बैठक बोलविले आहे.

हेही वाचा: पुण्यातील वीर धरण शंभर टक्के भरले

दरम्यान मागील आठवड्यात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना ही या संघर्ष समितीच्या सदस्यांनी भेटून निवेदन दिल्यानंतर, या विषयावर लवकरच तोडगा काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून या बैठकीकडे वीर धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top