आसू/जाधववाडी : फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन पंधरवडा उलटला. मात्र, अद्यापही कारखानदारांनी उसाचा दर जाहीर केलेला नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. .Cloudy weather : ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका; उत्पन्न घटण्याची भीती .फलटण तालुक्यात ऊसदराची कोंडी कोण फोडणार? याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा चांगल्या पाऊसमानामुळे उसाचे खोडवा पीक चांगले जोपासले गेले आहे. त्यामुळे रिकव्हरी चांगली मिळण्याची शक्यता आहे. वाढीव रिकव्हरीनुसार ऊसदर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे..दिवाळीपासून राज्यभरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. एफआरपी कायद्यानुसार शेतकऱ्याचा ऊस तुटल्यावर बिलाचा हप्ता १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. मात्र, अनेक कारखान्यांनी गाळप सुरू होऊन एक महिना झाला, तरी अजूनही दर जाहीर केला नाही, तसेच आंदोलन होत नसल्यामुळे प्रशासनाकडून ऊसदरासाठी बैठक घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.फलटण तालुक्यामध्ये सहकारी तत्त्वावर चालणारा श्रीराम, खासगी तत्त्वावर स्वराज, शरयू व साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया असे चार कारखाने आहेत. गेल्या वर्षी या चारी कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यासह तीन हजार १०० ते तीन हजार १७५ एवढा उसाला दर दिला आहे. शेजारच्या बारामती तालुक्यातील माळेगाव व सोमेश्वर कारखान्यांच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये भाव कमी मिळाला आहे. तालुक्यातील कारखान्यांकडून यावर्षी किमान तीन हजार ५०० रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गांनी गृहीत धरली आहे. .तालुक्यातील चारही कारखान्यांनी माळेगाव, सोमेश्वर कारखान्याच्या बरोबरीने दर देऊन शेतकरी हित साधावे, असेही अनेक शेतकरी मत व्यक्त करीत आहेत. केंद्र शासनाने साडेनऊ टक्के रिकव्हरी गृहीत धरून उसासाठी तीन हजार ४०० रुपये इतका रास्त किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे. एफआरपीपेक्षा अधिक दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यंदा चांगल्या पाऊसमानामुळे उसाचे खोडवा पीक चांगले जोपासले गेले आहे. त्यामुळे रिकवरी चांगली मिळण्याची शक्यता आहे. वाढीव रिकव्हरीनुसार ऊसदर मिळावा, अशी शेतकरी अपेक्षा बाळगून आहे..निवडणुकीत ऊस प्रश्नाकडे दुर्लक्षतालुक्यातील कारखाने सुरू होऊन १८-२० दिवस होत आले. यावर्षी कारखाना दराची कोंडी प्रथम कोण फोडणार? याकडे शेतकऱ्यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावर्षी हंगामाच्या तोंडावर निवडणूक आल्याने दराबाबत स्पर्धा लागेल व त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे अजिबात झाले नाही. उलट ऊस हंगामाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. दराबाबत कोणीही अवाक्षरही काढलं नाही. त्यात शेतकरी संघटनाही मूग गिळून गप्प बसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे..Railway Conducts Test : यंत्रणेच्या सतर्कतेची रेल्वेने घेतली चाचणी.येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने ऊस दराबाबत कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढावा. नाहीतर तिव्र आंदोलन उभारले जाणार आहे.- धनंजय महामुलकर जिल्हाध्यक्ष, स्वािभमानी शेतकरी संघटना.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.