
कऱ्हाड : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे महायुतीकडून निवडणुकीच्यावेळी आश्वासन देण्यात आले होते, मग आता ते पळ का काढते? उद्योजकांची कर्जे माफ करताना कुठली समिती लावली नाही, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच नियम, अटी का हव्यात? बुलेट ट्रेन व मेट्रोसाठी पैसे आहेत, मग शेतकऱ्यांसाठी का नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.