esakal | शुद्ध पाण्यासाठी महिलांचा कोयना प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

satara

शुद्ध पाण्यासाठी महिलांचा कोयना प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : भूस्खलन झाल्यापासून गढूळ व दूषित पाणी येत असल्याने संतप्त झालेल्या येथील महिलांनी कोयना प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला. कोयना प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांना गढूळ पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या.

हेही वाचा: चिंतेचं गोठोडं घेऊन जितकरवाडीकर घरांकडे

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी भूस्खलन झाले. त्यामुऴे कोयना धरणाचे पाणी गढूऴ येनू लागले. धरणाच्या कोयना वसाहतीत गढूळ पाणीपुरवठा होत हेता. त्यामुळे शुध्द पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली होती. कोयना वसाहतीत टँकरद्वारे पाणी चालु केला.

टँकरने कलेला पाणी पुरवठा कमी पडत असल्याने कोयनानगर मधील महिला वैतागल्या होत्या. पाणी शुध्द करणारी यंत्रणा सुरळीत करा. शुध्द पाण्याचा पुरवठा करा या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या. त्यांनी कोयना प्रकल्प कार्यालयावर गढूळ पाणी बाटली मोर्चा काढला आहे.

हेही वाचा: ‘किसन वीर’ ची निवडणूक लढवू : आमदार पाटील

राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सेन्हल जाधव, कुसुम शेलार, कोयनानगरच्या माजी सरपंच शैला मोहळकर, लता चव्हाण, विजया काळे, सुनिता मोहिते, वंदना आर्डे, प्रज्योती कोंडे देशमुख, कमल मोहिते, सुरेखा येडगे उपस्थीत होत्या. यावेळी महिलांनी प्रकल्प कार्यकारी अभियंता पोतदार यांना निवेदन व गढूळ पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या.

कार्यकारी अभियंता पोतदार म्हणाले पाणलोट क्षेत्रात प्रचंड झालेल्या भुसल्ख्नामुळे पाण्याने रंग बदलला आसला तरी पाणी अस्वच्छ व दूषित नाही. निसर्गाने हतबल असलो तरी असमर्थ नाही. दोन महिन्यापासून शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यात यश येईल. यावेळी उपविभागीय अभियंता सागर पाटील उपस्थित होते.

loading image
go to top