

ED Tightens Grip in Yashwant Bank Scam; Key Documents Seized
sakal
कऱ्हाड : यशवंत बँकेतील ११२ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने काल येथे, तसेच फलटणला छापा टाकून चौकशी केली. मध्यरात्रीनंतरही ईडीची तपासणी सुरू होती. तपासात ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. याप्रकरणी ईडीकडून काहींना नोटिसा बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास कळवले आहे.