शंभूमहादेवाची यात्रा यवतेश्‍वरमध्ये रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभूमहादेवाची यात्रा यवतेश्‍वरमध्ये रद्द

गर्दी टाळण्यासाठी स्थानिक नागरिक आणि देवस्थान पुजारी यांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शंभूमहादेवाची यात्रा यवतेश्‍वरमध्ये रद्द

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : यवतेश्‍वर येथे दिवाळीत होणारी शंभूमहादेवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. 13 व 14 नोव्हेंबरला ही यात्रा आहे. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय यवतेश्‍वर देवस्थानने घेतला आहे.

या यात्रेसाठी सातारा तालुक्‍याच्या विविध भागांतून भाविक, विक्रेते मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र, गर्दी टाळण्यासाठी स्थानिक नागरिक आणि देवस्थान पुजारी यांनी हा निर्णय घेतला.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यात्रेनिमित्त होणारे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत, याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन विश्‍वस्त भाऊसाहेब पवार आणि त्यांचे सहकारी विश्‍वस्त, पुजारी आणि ग्रामस्थांनी केले आहे.

डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर

सज्जनगडावरील मालमत्ता संस्थानला द्या,समर्थ सेवा मंडळाने देणग्यांचा तपशील द्यावा; न्यायालयाचा आदेश 

loading image
go to top