तुमच्या मोबाईलमध्ये हे app असेल तर त्वरित डिलीट करा

तुमच्या मोबाईलमध्ये हे app असेल तर त्वरित डिलीट करा
Updated on

मुंबई : TOTOK नावाचं प्रसिद्ध app आहे. या appला आता गुगल प्ले स्टोअर आणि appला स्टोअरवरून हटवण्यात आले आहे. जर हे app तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर, तत्काळ डिलीट करणे गरजेचे आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार वापरकर्त्यांची हेरगिरी करण्यासाठी या appचा उपयोग होत आहे. 

हे app युएईमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. परंतु भारतातही या appच्या वारकर्त्यांची संख्या भरपूर आहे. वयक्तिक चॅटिंगसाठी या appचा उपयोग भारतीय वापरकर्ते करत असतात. हे इतर चॅटिंग appपेक्षा नविन app आहे. या रिपोर्टच्या मते भारतात या appचे 10 लाखापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. हे app वापरकर्त्यांची प्रत्येक हालचाल, मल्टिमीडिया फाईल्स तसेच वापरकर्त्यांचे संभाषण ट्रेस करत आहे.    

न्युयॉर्क टाइम्सच्या एका शोधात ही बाब समोर आली आहे. असं म्हटलं जातंय की, या appला Breej Holding नावाच्या एका कंपनीने विकसित केले आहे. ही कंपनी Darkmatter ह्या कंपनीच्या जवळची कंपनी आहे. Darkmatter ही अबूधाबीमध्ये असलेली सायबर इंटलिजेंस कंपनी आहे.

हेच app उत्तर अमेरिका, अफ्रिका, एशियास, युरोप आणि मध्यपूर्व आशिया मध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे.  Dark matter या अबुधाबीतील कंपनीत माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विभागातील कर्मचारी आणि अमिरात के इंटेलिजेंस अधिकारी काम करतात. सध्या Darkmatter या कंपनीचा तपास अमेरिकेची FBI करत आहे.

जर तुम्ही हे app वापरत असाल. हे app तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर, त्वरीत डिलीट करा. या appमुळे काही डेटा मोबाईलमध्ये राहिला असेल तर तोही मॅन्युअली डिलिट करता येतो. तो डेटा तुम्हाला डिलीट करता येईल. न्युयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टवर सध्यातरी कंपनीकडून कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही. आणि सध्या हे app उपलब्ध देखिल नाही.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com