Spy Apps : हे 12 चॅटिंग अन् न्यूज अ‍ॅप्स चोरतायत तुमचा डेटा; फोनच्या कॅमेऱ्याचाही करतायत वापर.. पाहा संपूर्ण यादी!

Android Apps : सिक्युरिटी रिसर्चर ESET ने असे 12 अँड्रॉईड अ‍ॅप्स डिटेक्ट केले आहेत, जे यूजरचा डेटा चोरत होते.
Spy Apps
Spy AppseSakal

Spy Apps on Play Store : आजकाल आपल्या घरातील तिजोरीपेक्षाही आपला स्मार्टफोन मौल्यवान झाला आहे. फोनच्या किंमतीमुळे नव्हे, तर त्यातील डेटामुळे असं झालंय. आपल्या फोनमध्ये आपले खासगी फोटो, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, बँकिंग डीटेल्स आणि अन्य बरंच काही असतं. अशात जर तुमच्या फोनमधील काही अ‍ॅप्स हा डेटा चोरत असतील तर?

सिक्युरिटी रिसर्चर ESET ने असे 12 अँड्रॉईड अ‍ॅप्स डिटेक्ट केले आहेत, जे यूजरचा डेटा चोरत होते. यातील 11 अ‍ॅप्स हे मेसेजिंग अ‍ॅप्स आहेत, तर एक न्यूज अ‍ॅप असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ट्रोजन व्हायरस

या सर्व अ‍ॅप्सच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये रिमोट अ‍ॅक्सेस ट्रोजन (RAT) कोड सोडला जात होता. याला वज्रस्पाय (VajraSpy) नावाने ओळखलं जातं. हा व्हायरस अ‍ॅप्सच्या सोबत मिळून फोनमध्ये शिरतो, आणि अ‍ॅप परमिशन्सच्या मदतीने हेरगिरी करतो. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हा व्हायरस यूजर्सचे कॉन्टॅक्ट्स, फाईल्स, कॉल लॉग्स, एसएमएस अशा गोष्टी चोरू शकतो. काही अ‍ॅप्समध्ये तर यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज देखील चोरले जाऊ शकतात. हे अ‍ॅप्स या मेसेजेसची एक कॉपी नकळत आपल्याकडे सेव्ह करतात. यातील काही अ‍ॅप्सच्या मदतीने सायबर क्रिमिनल्स फोन कॉल रेकॉर्ड करणे, फोनचा कॅमेरा तुमच्या नकळत ऑपरेट करणे अशी कामंही करू शकतात.

Spy Apps
Fake Loan Apps : फेक लोन अ‍ॅप्सवर गुगलची सर्वात मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटवले तब्बल 2,200 अ‍ॅप्स

कोणते आहेत अ‍ॅप्स

  • हॅलो चॅट (Hello Chat)

  • चिट चॅट (Chit Chat)

  • मीट मी (Meet Me)

  • निडुस (Nidus)

  • टिक टॉक (Tik Talk)

  • वेव्ह चॅट (Wave Chat)

  • प्रायव्हेट टॉक (Prive Talk)

  • ग्लो ग्लो (Glow Glow)

  • लेट्स चॅट (Lets Chat)

  • क्विक चॅट (Quick Chat)

  • योहो टॉक (Yoho Talk)

गुगलने केली कारवाई

हे सर्व अ‍ॅप्स भारत आणि पाकिस्तानात बरेच लोकप्रिय होते. गुगलच्या प्ले-स्टोअरवर हे अ‍ॅप्स उपलब्ध होते. आता गुगलने हे अ‍ॅप्स हटवले आहेत. ज्यांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स आधीपासून डाऊनलोड केलेले आहेत त्यांना मात्र मॅन्युअली ते अनइनस्टॉल करावे लागणार आहेत.

Spy Apps
Cyber Crime : आता कंपनीचे कॉल्स येणार सहा अंकी क्रमांकावरुन; फोनवरुन होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com