2021 Audi Q5 भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत | 2021 Audi Q5 launched | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2021 Audi Q5

2021 Audi Q5 भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर्मन कार कंपनी Audi ने भारतीय बाजारात त्यांची Q5 फेसलिफ्ट SUV लाँच केली आहे. अतिशय आकर्षक स्टाइलिंग आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेल्या या कारची किंमत 58.93 लाख रुपयांपासून सुरु होते. दरम्यान ऑडीने दोन वर्षांपुर्वी कडक BS6 उत्सर्जन नियमांमुळे ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेतून काढून घेतली होती.

कंपनीने दावा केला आहे की, कारच्या 100 पेक्षा जास्त युनिट्स हे आधीच बुक केले गेले आहेत आणि कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. नवीन Q5 सह, ऑडीकडे आता Q सीरीजमध्ये तीन SUV आहेत, ज्यात RS Q8 व्यतिरिक्त Q2 आणि Q8 यांचा देखील समावेश आहे. कंपनीने पाच इलेक्ट्रिक कार लाँच केल्यानंतर या आर्थिक वर्षातील ऑडीचे हे नववे मॉडेल आहे.

हेही वाचा: तुमचा पासवर्ड हॅक झालाय? 'गुगल क्रोम पासवर्ड चेकर' वापरुन लगेच तपासा

2021 ऑडी Q5 दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, परफॉर्मन्स प्लस ट्रिम आणि हाय-स्पेक टेक्नॉलॉजी ट्रिम. BMW X3, मर्सिडीज GLC किंवा अगदी अलीकडेच लाँच झालेल्या Volvo XC60 सारख्या प्रतिस्पर्ध्यी कार्सना टक्कर देईल.

जर्मन ऑटो कंपनीने या कारमध्ये डिझेल इंजिन वगळण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता एसयूव्हीला पावर देण्यासाठी फक्त पेट्रोल युनिट देण्यात आले आहे. हे 2.0-लिटर चार-सिलेंडर इंजिन, सात-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, जे 249 bhp ची पावर आणि 370 Nm चे पीक टॉर्क जनरेट करू शकते. ऑडी Q5 मधील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे थर्ड जनरेशन मॉड्युलर इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्म किंवा MIB 3 सह नवीन 10.1-इंच टचस्क्रीन. हे हॅप्टिक फीडबॅक देते आणि ऑडीचा लेटेस्ट MMI टच, व्हॉइस कंट्रोल, Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.

हेही वाचा: कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

loading image
go to top