esakal | 2021 Force Gurkha दमदार SUV, लवकरच होतेय लॉंच; पाहा फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

2021 Force Gurkha

2021 Force Gurkha दमदार SUV, लवकरच होतेय लॉंच; पाहा फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

महिंद्रा थार एसयूव्हीला टक्कर देण्यासाठी 2021 फोर्स गुरखा (2021 Force Gurkha) या आठवड्यात लॉंच होणार आहे. लॉंच होण्यापुर्वी 2021 गुरखाचे काही फीचर्स उघड झाले आहेत, ज्यात त्याची एसयूव्हीचे डिझाइन आणि लुक समोर आला आहे. अलीकडेच फोर्स मोटर्सने या दमदार एसयूव्हीचा टीझर देखील रिलीज केला आहे, ज्यात गुरखा एसयूव्ही बद्दल बरीच माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात...

मोठे रुंद ग्रील, गोल एलईडी हेडलाइट गुरखा एसयूव्हीमध्ये देण्यात आल्या आहेत. या हेडलाइट्सवर गुरखा बॅजिंग देखील तुम्हाला दिसेल. या सोबतच गुरखा एसयूव्हीला टर्न इंडिकेटर्स देखील दिले आहेत जे हेडलाइट्सच्या वर बसवले जातात. नवीन गुरखामध्ये ड्रायव्हर साइडला स्नोर्कल तसेच एसयूव्हीला नवीन शार्क गिल व्हेंटसह नव्याने डिझाइन केलेले बोनेट देखील देण्यात आले आहे. 2021 गुरखा एसयूव्हीला वॉटर-वेडिंग वाहन बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. फोर्स गुरखाला नव्याने डिझाइन केलेले टेललाइट्स, नवीन व्हील सेट, टेलगेट-माऊंटेड स्पेअर व्हील आणि फंक्शनल रूफ कॅरियर देखील देण्यात आले आहे.

हेही वाचा: टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही Punch लवकरच होणार लॉंच; पाहा फीचर्स

या टीझरमध्ये फोर्स मोटरने इंटीरियर देखील माहिती उघड केली आहे, तुम्हाला या एसयूव्ही मध्ये ऑल-ब्लॅक कलर थीम मिळण्याची शक्यता आहे. केबिनमध्ये कमी NVH ठेवण्यासाठी मोल्डेड फ्लोर मॅट, तसेच डिजिटल इन्फोटेनमेंट स्क्रीनसह आणखी बरेच फीचर्स असतील. 2021 फोर्स गुरखाची चार सीट एडीशन मागील बाजूस कॅप्टन सीट्ससह येईल. ज्यामध्ये मागच्या दोन्ही प्रवाशांसाठी आर्मरेस्ट देखील देण्यात आलेले आहेत. सीटवर देण्यात आलेले गुरखा बॅजिंग या सीट्सना प्रीमियम टच देते. तसेच महिंद्रा थार प्रमाणेच गुराखामध्ये देखील देण्यात आलेल्या साईडच्या मोठ्या सीलबंद खिडक्या प्रवाशांसाठी व्हिजीबिलीटी वाढवतील.

2021 फोर्स गुरखा एसयूव्ही मध्ये 2.6-लिटर डिझेल इंजिन देण्यात येण्याची शक्यता आहे, जे 89 बीएचपीची पावर आणि 260 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल . इंजिनमध्ये 4X4 मोडसाठी 5-स्पीड गिअरबॉक्स स्वतंत्र गिअर लीव्हरसह देण्यात येईल. किंमतीच्या बाबत सांगायचे झाल्यास नवीन फोर्स गुरखाची किंमत 10 लाख रुपये ते 12 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: स्वस्तात मिळतात 'या' सनरुफ असलेल्या कार, पाहा किंमत आणि फीचर्स

loading image
go to top