टेन्शन संपलं! फुल्ल चार्जमध्ये 97 किमी धावणारी गाडी लॉन्च; जाणून घ्या, Piaggio च्या EV चे फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Piaggio 1

टेन्शन संपलं! फुल्ल चार्जमध्ये 97 किमी धावणारी गाडी लॉन्च; जाणून घ्या, Piaggio च्या EV चे फीचर्स

Piaggio ने आपल्या Piaggio 1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या सिरीजमध्ये नवीन भर घातली आहे. कंपनीने Piaggio 1 ई-स्कूटरचे मॉडेल सादर केले आहे. या अंतर्गत, कंपनीने तीन मॉडेल लॉन्च केले आहेत. ज्यात Piaggio 1, Piaggio 1+ आणि Piaggio 1 Active यांचा समावेश आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वेगवेगळे टॉप स्पीड दिले आहेत. याशिवाय, सिरीजमध्ये विविध रंगांचे मॉडेल सादर केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना अनेक रंगांमध्ये खरेदी करण्याची निवड असणार आहे.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

Piaggio 1 2023 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

कंपनीने Piaggio 1 2023 मॉडेलच्या किंमतीचे तपशील अद्याप सांगितलेले नाहीत. या स्कूटर्सचे विविध रंगांचे मॉडेल सादर केले आहेत. यामध्ये राखाडी, पांढरा, काळा,  पिवळा  या रंगांचा समावेश आहे.

Piaggio 1 2023 इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

Piaggio इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहेत. आता या इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीने Piaggio 1, Piaggio 1+ आणि Piaggio 1 Active या मालिकेतील तीन नवीन मॉडेल बाजारात आणले आहेत. हे इटलीतील मिलान येथील 2022 EICMA मध्ये सादर केले गेले आहेत. कंपनीने Piaggio 1 आणि Piaggio 1+ मध्ये 45km/h चा टॉप स्पीड दिला आहे. Piaggio 1 ची रेंज 55km आहे. तर Piaggio 1+ ची रेंज 97km आहे. Piaggio 1 Active चा टॉप स्पीड 60km/h आहे. तिन्ही स्कूटरमध्ये रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देण्यात आला आहे. त्यामुळे स्कूटर चार्ज करणे अधिक सोपे होणार आहे.

हेही वाचा: Jio 5G Speed : जिओ 5G ची कमाल; अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड झाला KGF2 पिक्चर

Piaggio 1 2023 मॉडेल हे कंपनीने कमी वजनाचे मॉडेल आहे. शहरी रस्त्यांवर गाडी चालवण्यासाठी या स्कूटर्सची रचना करण्यात आली आहे. या गाडीची मोटर मागील चाकावर देण्यात आली आहे. गाडीच्या गुणवत्तेबद्दल बोलताना, कंपनीने नमूद केल्याप्रमाणे त्यांची फ्रेम मजबूत आहे. स्कूटरला डिजिटल इंस्ट्रुमेंटेशन पॅनेल, संपूर्ण एलईडी लाइटिंग आणि कीलेस ऑपरेशन मिळते हे आधुनिक फिचर्स दिलेले आहेत. दुचाकीच्या सीटखालीही बरीच जागा देण्यात आली आहे, जेणेकरून हेल्मेटसह इतर वस्तू ठेवता येतील.