अत्याधुनिक फिचर्ससह यंदा लाँच होणार स्विफ्टचे नवीन मॉडेल! जाणून घ्या

Maruti Suzuki Swift: नेक्स्ट जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट अनेक मोठ्या बदलांसह बाजारात येणार आहे.
Maruti Suzuki Swift
Maruti Suzuki Swift Sakal

मारुती सुझुकी स्विफ्टच्या (Maruti Suzuki Swift) नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर (Model) काम करत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी हे नवं मॉडेल 2022 मध्ये सादर करू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नेक्स्ट जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट अनेक मोठ्या बदलांसह बाजारात येणार आहे. हे मॉडेल नव्याने विकसित केलेल्या प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. (A new model of Maruti Suzuki Swift will be launched this year with the latest features.)

Maruti Suzuki Swift
देशातील सर्वात स्वस्त एसयूव्ही झाली महाग!

2022 स्विफ्ट असेल अधिक मजबूत आणि सुरक्षित (2022 Swift will be Stronger and Safer)-

सध्या भारतात विकली जाणारी स्विफ्ट कार लाइटवेट HEARTECT प्लॅटफॉर्मवर विकसित केली गेली आहे, ज्या प्लॅटफॉर्मवर Baleno आणि DZire आधारित आहेत. नवीन प्लॅटफॉर्ममध्ये मजबूत स्टीलचा वापर केला जाईल, ज्यामुळे नवीन स्विफ्ट सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक मजबूत आणि सुरक्षित होईल.

इंजिन (Engine)-

नेक्स्ट-जनरल सुझुकी स्विफ्टच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 1.2-लिटर नॅच्युरल-इस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिन माइल्ड हायब्रीड सिस्टमसह दिले जाईल. सुझुकी नेक्स्ट जनरेशन स्विफ्टचे स्पोर्ट मॉडेल देखील विकसित करत आहे. येत्या काळात भारतीय बाजारपेठेत यापैकी ते सादर केले जाण्याची शक्यता आहे.

Maruti Suzuki Swift
पेट्रोल आणि डिझेल कार मध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या.

सध्याचे स्विफ्ट प्रकार आणि किमती (Current Swift types and prices)-

मारुती सुझुकी स्विफ्ट 2021 हॅचबॅकचा बेस LXI प्रकार 5.90 लाख रुपये, एक्स-शोरूम, सुरू होतो. आणि टॉप-ऑफ-द-लाइन ZXI+ ड्युअल टोन प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 8.63 लाख रुपये आहे. नवीन स्विफ्ट 5 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे - LXI (LXI), VXI (VXI), ZXI (ZXI), ZXI+ (ZXI+) आणि ZXI+ ड्युअल टोन (ZXI+ ड्युअल टोन).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com