Aadhaar : आधार कार्डही होतं एक्सपायर; अशी तपासा तुमच्या कार्डची वैधता

तुमचं आधार कार्ड अपडेट ठेवणं गरजेचं आहे.
Aadhaar Expiry
Aadhaar ExpiryeSakal

भारतात कुठेही जा तुम्हाला आधार कार्डची गरज भासतेच. कित्येक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता असते. अगदी शाळेत प्रवेश घेण्यापासून ते बँकेत खातं उघडण्यापर्यंत तुमचा आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतो. मात्र, हे आधार कार्ड एक्स्पायर देखील होतं, हे तुम्हाला माहिती आहे का?

एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड साधारणपणे आयुष्यभरासाठी वैध असतं. मात्र, पाच वर्षांपेक्षा लहान मुलांचं काढलेलं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागतं. अन्यथा असं आधार कार्ड मूल मोठं झाल्यानंतर अवैध ठरतं.

Aadhaar Expiry
PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?

काय असतं बाल आधार कार्ड?

पाच वर्षांपेक्षा लहान मुलांचं आधार कार्ड काढता येतं. मात्र, त्यांना वेगळं- निळ्या रंगाचं आधार कार्ड दिलं जातं. याला बाल आधार कार्ड म्हणतात. मूल पाच वर्षांचं झाल्यानंतर हे आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं असतं. अपडेट न केल्यास हे आधार कार्ड एक्स्पायर होतं.

यानंतर मूल १५ वर्षांचं झाल्यानंतर पुन्हा एकदा हे आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं असतं. यासोबतच केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, योग्य माहितीसाठी दर दहा वर्षांनी आपलं आधार कार्ड अपडेट करून घेणं आवश्यक आहे.

Aadhaar Expiry
Aadhaar बद्दलची सर्व माहिती मिळेल केवळ एका फोन कॉलवर, तुमच्या मदतीसाठी UIDAI ने जारी केला ट्रोल फ्री नंबर

अशी तपासा वैधता

तुमचं आधार कार्ड वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाईटवर (uidai.gov.in) जावं लागेल. यानंतर होमपेजवर आधार सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा. यानंतर आलेल्या पर्यायांमधून व्हेरिफाय आधार नंबर हा पर्याय निवडा.

यानंतर तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर व्हेरिफाय हे बटन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्डे वैध आहे की अवैध हे कळेल.

Aadhaar Expiry
Aadhaar : आठ वर्षांच्या मुलाचं आधार कार्ड, अन् फोटो देवेंद्र फडणवीसांचा! सात वर्षांपासून होतोय वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com