एक लाखापेक्षा कमी किंमतीत हवीय दमदार बाईक? पाहा बेस्ट ऑप्शन्स

TVS Raider 125
TVS Raider 125google

तुम्ही जर एखादी पावरफुल बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. या किंमतीच्या रेंजमध्ये तुम्हाला अनेक बाईक्सचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण जर तुमचे बजेट 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही या किंमतीत एक दमदार बाइक शोधत असाल, तर आज आपण अशा 5 बेस्ट मोटरसायकल ऑप्शन्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्या किफायतशीर तसेच दमदार तर आहेतच सोबतच त्या फ्युल इफिशीयंट देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या बाईक…

Bajaj Pulsar 150 Neon

बजाज पल्सर 150 ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. ही भारतातील नंबर 1 स्पोर्ट्स बाईक असल्याचा बजाज कंपनीचा दावा आहे. या बाईकमध्ये 149.5cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे जे 8,500rpm वर 13.8bhp पॉवर आणि 6,500rpm वर 13.25Nm पीक टॉर्क जनरेट करते. बजाज पल्सर निऑनमध्ये 15 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर बाईकच्या पुढच्या भागात टेलिस्कोपिक 31mm कंन्वेशनल फोर्क देण्यात आला आहे. बाईकच्या पुढील बाजूस ABS, 260mm डिस्क ब्रेक आहेत. - किंमत 99,418 रुपये

Bajaj Pulsar NS125

तुमच्या बजेटमध्ये बसणारी बजाज ऑटोची एंट्री-लेव्हल पल्सर NS सीरीज मोटरसायकल तुम्ही खरेदी करु शकता. पल्सर NS125 स्पोर्टी डिझाइनसह येते. सोबतच बाइकमध्ये 124.45cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे जे 8500 rpm वर 11.6 bhp पॉवर आणि 7000 rpm वर 11Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये अँटी स्किड ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली असून 240mm फ्रंट पेटल-डिस्क आणि 130mm रियर ड्रम ब्रेक आहेत. बाईकमध्ये BSVI कंप्लायंट DTS-i EI इंजिन देण्यात आले आहे. तसेच या बाईकमध्ये 12 लीटरची इंधन टाकी आहे. किंमत 99,347 रुपये.

TVS Raider 125
लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

TVS Raider 125

नवीन TVS Raider 125 हे त्याच्या सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक आहे. ही TVS बाईक आधुनिक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्ससोबत लॉंच करण्यात आली आहे. TVS Raider 125 मध्ये तुम्हाला LED DRL सह LED हेडलाइट दिली असून पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले, आयडल स्टार्ट-स्टॉप सिस्टम, 2 राइड मोड, सीटखालील स्टोरेज स्पेस मिळेल. कनेक्टेड व्हेरियंटमध्ये TVS SmartXonnect ब्लूटूथ मॉड्यूल आणि कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. बाइकमध्ये 124.8cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन असून बाईकचे इंजिन 7500rpm वर 11.2 bhp पॉवर आणि 6,000rpm वर 11.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. - किंमत 77,500 रुपये

Honda SP 125

Honda 2 Wheeler ची ही प्रीमियम कम्युटर मोटरसायकल तिच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम बाइकपैकी एक आहे. ही होंडा बाईकमध्ये तुम्हाला एलईडी हेडलाइट, फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि आधुनिक स्विचगियर देण्यात येतात. बाइकमध्ये 124cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. बाईकचे इंजिन 7500 rpm वर 10.72bhp पॉवर आणि 6000 rpm वर 10.9Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन आहे. किंमत 78,810 रुपये.

TVS Raider 125
देशातील टॉप तीन इलेक्ट्रीक कार; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स

Hero Glamour

Hero MotoCorp ची ग्लॅमर 125 ही भारतातील सर्वात परवडणारी 125cc मोटरसायकल आहे. बाइकमध्ये 124.7cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे. बाईकचे हे इंजिन 7500 rpm वर 10.72bhp पॉवर आणि 6,000 rpm वर 10.6Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाइकचे XTec मॉडेल एलईडी लाइटिंग आणि ब्लूटूथ-इनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. किंमत 75,900 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com