सॅमसंगचा परवडणारा स्मार्टफोन, मिळेल 1TB पर्यंत स्टोरेज अन् बरंच काही

affordable samsung galaxy a03 launched in india with true 48mp camera check price and all details
affordable samsung galaxy a03 launched in india with true 48mp camera check price and all details

Samsung Galaxy A03 : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास खिशाला परवडणारा स्मार्टफोन आपण पाहाणार आहोत. सॅमसंग कंपनीने भारतात आपला परवडणारा Galaxy A03 लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A-सिरीजमधील हा लेटेस्ट फोन, लाइव्ह फोकससह तीक्ष्ण फोटो कॅप्चर करण्यासाठी ट्रू 48MP ड्युअल रिअर कॅमेरासह 6.5-इंच HD+ डिस्प्लेसह येतो. चला तर मग या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सवर झटपट नजर टाकूया…

Galaxy A03 मध्ये काय खास आहे…

- Galaxy A03 मध्ये ट्रू 48MP रियर कॅमेरा आहे. तसेच यात 2MP डेप्थ कॅमेरा तुम्हाला लाइव्ह फोकससह शार्प पोर्ट्रेट क्लिक आणि नॅचरल ब्लर इफेक्ट देतो. एका क्लिकवर तुम्हाला सोशल मीडियासाठी फोटो घेण्यासाठी Galaxy A03 मध्ये ब्युटी मोडसह 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. Galaxy A03 मध्ये 'स्मार्ट सेल्फी एंगल' फीचर देखील येते, जेव्‍हा फ्रेममध्‍ये एकाधिक चेहरे आढळल्‍यावर आपोआप वाईड अँगलवर स्‍विच करून दर्जेदार ग्रुप सेल्फी क्लिक करता येते

- फोन शक्तिशाली ऑक्टा-कोर 1.6GHz प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि ऑप्टिमाइझ परफॉर्मन्स आणि स्मूथ मल्टीटास्किंग अनुभव देतो. 4GB पर्यंत RAM सह, Galaxy A03 एकापेक्षा जास्त अॅप्स ब्राउझ करताना आणि वापरताना फास्ट प्रोडक्टिव्हीटी देतो आणि कमी उर्जा वापर करतो

affordable samsung galaxy a03 launched in india with true 48mp camera check price and all details
'तृतीयपंथीयांबाबत सरकारचा मोठा निर्णय; राजेश टोपेंनी दिल्या सूचना

फोनमध्ये जास्त काळ चालावा यासाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. कंपनी म्हणते की Galaxy A03 तुम्हाला दिवसभर पुरेशी पावर देते तुमचा फोन चार्ज करण्याचा वेळ वाचवण्यात मदत होते.

- फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे जो फोनवर कंटेंट पाहण्याची आवड असलेल्यांसाठी इमर्सिव्ह अनुभव दोत. Galaxy A03 सह, तुम्ही तुमचे आवडते चित्रपट आणि शो पाहताना वायर्ड आणि ब्लूटूथ हेडसेटवर डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह सिनेमा पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

- Galaxy A03 Android 11 आणि One UI Core 3.1 ला सपोर्ट करतो. Galaxy A03 हा 32GB आणि 64GB इंटरनल स्टोरेज आणि 1TB पर्यंत वाढवता येण्याजोग्या मेमरीसह येतो.

affordable samsung galaxy a03 launched in india with true 48mp camera check price and all details
चार्जिगचं नो टेन्शन, हे स्वस्तात मस्त नेकबॅंड राहातात 41 दिवस चार्ज

भारतात Galaxy A03 ची किंमत

फोन तीन रंगांच्या ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल, ज्यात - काळा, लाल आणि निळा यांचा समावेश आहे. याच्या 3GB + 32GB व्हेरिएंटसाठी तुम्हाला 10,499 रुपये आणि 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी 11,999 रुपये किंमत मोजावी लागणार आहे. तसेच हा Galaxy A03 फोन सर्व रिटेल स्टोअर्स, Samsung.com आणि आघाडीच्या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल.

affordable samsung galaxy a03 launched in india with true 48mp camera check price and all details
परीक्षेनंतर मामाकडे आलेली नववीची मुलगी गरोदर; दोन वेळा अत्याचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com