एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि जिओचे डेली 2 जीबी डेटासाठी हे आहेत बेस्ट प्लॅन

Airtel, Vodafone Idea and Geo Daily are the best plans with 2GB data
Airtel, Vodafone Idea and Geo Daily are the best plans with 2GB data

पुणे : व्होडाफोन आयडिया लिमिटेड सध्याच्या काळासाठी एक विशेष डबल डेटा ऑफर चालवत आहे. त्याअंतर्गत कंपनीला 299, 449 आणि 699 रुपयांच्या प्लॅनचा डबल डेटा मिळत आहे.

सध्या मोबाइल डेटा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि विशेषत: सध्या जेव्हा भारतासह जगभरातील लोक त्यांच्या घरात बसून आहेत. अलीकडेच तुम्हाला व्होडाफोन आयडिया, एअरटेल, जिओ आणि बीएसएनएलच्या सर्वोत्कृष्ट मोबाइल डेटा प्लॅन माहित झाले असतील ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. जर तुमचा वापर यापेक्षा अधिक असेल आणि तुम्ही दररोजच्या डेटासह एखादी प्लॅन शोधत असाल तर चांगली गोष्ट म्हणजे तुमचे काम सोप्पे केले आहे. चला तर मग व्होडाफोन आयडिया, एअरटेल आणि जिओच्या सर्वोत्तम 2 जीबी डेटासह प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

एअरटेल 2 जीबी डेली डेटा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

एअरटेलची सर्वात स्वस्त 2 जीबी डेटा प्लॅन 252.54 रुपयांपासून सुरू होते. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 100 दैनंदिन एसएमएस फ्री अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग देखील देण्यात आली आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. कंपनी 295.76 रुपयांची प्लॅन देखील देते, ज्यात 252 रुपयांच्या प्लॅनसारखेच फायदे आणि वैधता आहेत, परंतु अ‍ॅमेझान प्राइम सब्सक्रिप्शन देखील मिळते.

एअरटेलच्या 380.51 रुपये आणि रोजच्या 591.53 रुपयांच्या डेटा प्लॅनचे सर्व फायदे 252.54 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहे. या प्लॅनमध्ये डेली 2 जीबी डेटा, फ्री अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग, फ्री 100 डेली एसएमएस देखील मिळतो. त्यांची वैधता भिन्न आहे. एअरटेलच्या 380.51 रुपये आणि 591.53  रुपयांच्या योजनांच्या अनुक्रमे 56 दिवस आणि 84 दिवसांची वैधता आहे. जर तुम्हाला संपूर्ण वर्ष एकत्रितपणे रिचार्ज करायचे असेल तर कंपनी 2116.95 रुपयांचे प्लॅन देखील देते, त्यातील सर्व फायदे वर नमूद केलेल्या प्लॅनप्रमाणेच आहेत, तर तुम्हाला संपूर्ण 365 दिवसांची वैधता मिळेल.

व्होडाफोन आयडिया 2 जीबी डेली डेटा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 

व्होडाफोन आयडिया लिमिटेड सध्याच्या काळासाठी एक विशेष डबल डेटा ऑफर चालवित आहे. त्याअंतर्गत कंपनीला 299, 449 आणि 699 रुपयांच्या प्लॅनचा डबल डेटा मिळत आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबीचा उच्च-स्पीड डेटा उपलब्ध होता आणि मर्यादित काळासाठी या प्लॅनवर डेली 4 जीबी डेटा उपलब्ध होता. त्यांची वैधता क्रमश: 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवस आहे. हे तीन प्लॅन लोकल आणि नॅशनल कॉलिंग, डेली 100 एसएमएस प्रदान करतात.

या व्यतिरिक्त व्होडाफोन वापरकर्त्यांना 499 रुपये किंमतीची व्होडाफोन प्ले सब्सक्रिप्शन आणि 999 रुपयांची ZEE5 सब्सक्रिप्शन आहे. लक्षात ठेवा की, या दोन्ही सब्सक्रिप्शन आयडिया सदस्यांसाठी नाहीत. डेली प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटामध्ये, कंपनी पूर्ण वर्षाच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते, परंतु 2 जीबी डेली डेटासाठी अशी लॉन्ग टर्म व्हॅलिडिटी प्लॅन उपलब्ध नाही.

रिलायन्स जिओची 2 जीबी डेली डेटा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
 
जिओच्या 249 रुपये, 444 रुपये, 599 रुपये आणि 2399 रुपयांच्या चारही प्लॅनमध्ये डेली 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त त्यांना डेली100 फ्री एसएमएस आणि जिओ कडून फ्री अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. जिओकडून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी, या चार प्लॅन ना अनुक्रमे 1000, 2000, 3000 आणि 12000 नॉन-जियो FUP मिनिटे मिळतात आणि त्यांची वैधता अनुक्रमे 28, 56, 84 आणि 365 दिवसांची आहे.

जियोकडे देखील 2,599 रुपयांची प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. ज्यात 2,399 रुपयांच्या प्लॅनसारखेच फायदे आणि वैधता आहे. परंतु या प्लॅनमध्ये यूज़र्सना 10GB अतिरिक्त एकूण डेटा आणि Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन मिळेल. तुम्ही वार्षिक प्लॅन तसेच डिस्ने हॉटस्टार मेंबरशिप हवी असल्यास ही प्लॅन निःसंशयपणे तुमच्यासाठी बेस्ट आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com