Amazon : प्राईम यूजर्सना गंडवणं अमेझॉनला पडलं महागात; अमेरिकेतील कोर्टात याचिका दाखल

अमेझॉनच्या विरोधात एफटीसीने एका महिन्यात ही तिसरी याचिका दाखल केली आहे.
Amazon Prime
Amazon PrimeeSakal

जगातील मोठी ई-कॉमर्स साईट असणारी अमेझॉन कंपनी सध्या अडचणीत सापडली आहे. आपल्या प्राईम यूजर्सची फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) हे आरोप करत, कंपनीला कोर्टात खेचलं आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार, अमेझॉनने आपली प्राईम (Amazon Prime) मेंबरशिप रद्द करण्याची प्रक्रिया जाणून-बुजून किचकट केल्याचा आरोप FTC ने केला आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन एजन्सीने याप्रकरणी वॉशिंग्टन स्टेट फेडरल कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Amazon Prime
Amazon New Feature : अमेझॉनने सुरू केली Dine-in पेमेंट फीचरची चाचणी; झोमॅटो-स्विग्गीचं टेन्शन वाढलं!

प्रक्रिया किचकट

अमेझॉन आपल्या यूजर्सकडून प्राईम मेंबरशिपसाठी १३९ डॉलर्स प्रतिवर्ष एवढे चार्जेस आकारते. यामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग, १० कोटी गाणी, फास्ट आणि मोफत डिलिव्हरी अशा सुविधा मिळतात. मात्र, एखाद्या यूजरला प्राईम मेंबरशिप (Prime Membership) रद्द करायची असेल तर त्यासाठीची प्रक्रिया अगदी किचकट केली आहे.

मेंबरशिप रद्द करण्यासाठी यूजर्सना कित्येक स्टेप फॉलो कराव्या लागतात. तसंच, यूजर्सच्या सहमतीशिवाय चलाखी करून अमेझॉनने त्यांची प्राईम मेंबरशिप वाढवली असल्याचा आरोपही FTC ने केला आहे. यामुळे यूजर्सचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

किती आहे अवघड?

अमेझॉनची प्राईम मेंबरशिप रद्द करण्यासाठी यूजर्सना कमीत कमी पाच टप्प्यांमधून जावं लागतं. मोबाईलवर हीच प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला सहा विविध पेजेसवर जावं लागतं. अमेझॉनची ही प्रक्रिया म्हणजे २०१०च्या कंझ्यूमर प्रोटेक्शन कायद्याचे उल्लंघन आहे. असं एफटीसीने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

Amazon Prime
OTT platforms : 'खबरदार जर यापुढे...' Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, Zee5 ला गंभीर इशारा!

अमेझॉन विरोधात तिसरी याचिका

अमेझॉनच्या विरोधात एफटीसीने एका महिन्यात ही तिसरी याचिका दाखल केली आहे. यापूर्वी अमेझॉनची अ‍ॅलेक्सा स्पीकर लहान मुलांचा डेटा कलेक्ट करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

तसंच, अमेझॉनने तयार केलेले रिंग डोअरबेल्स आणि कॅमेरे हे यूजर्सचा डेटा चोरत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. हे आरोप अमेझॉनने फेटाळले होते, मात्र या प्रकरणांच्या सेटलमेंटसाठी अमेझॉनने ३.०८ कोटी डॉलर्स एवढी भरपाई देण्याची तयारी दाखवली होती.

Amazon Prime
Amazon Investment: भारतीयांना दरवर्षी मिळणार दीड लाख नोकऱ्या! अ‍ॅमेझॉन करणार मोठी गुंतवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com