esakal | आपण अजूनही बघतोय 5Gची वाट पण 'या' दोन देशांत सुरु झालीय 6G लाँच करण्याची रेस
sakal

बोलून बातमी शोधा

America and China are opposite to each other over launching of 6G technology

आता भारतीयांना वेध लागलेत ते म्हणजे 5G चे. देशात लवकरच 5G येणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र अजूनही ग्राहक 5Gची वाट बघताहेत. मात्र

आपण अजूनही बघतोय 5Gची वाट पण 'या' दोन देशांत सुरु झालीय 6G लाँच करण्याची रेस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर: आपल्या आयुष्यात मोबाईल आणि इंटरनेट या दोन गोष्टींना असाधारण महत्व आहे. भारतात करोडो लोक मोबाईलचा वापर करतात. मात्र आता यासोबतच इंटरनेटसुद्धा गरजेचं साधन झालं आहे. आधी 2G नंतर 3G आणि 4G इंटरनेटनं यूजर्सना अक्षरशः भुरळ घातली. मात्र आता भारतीयांना वेध लागलेत ते म्हणजे 5G चे. देशात लवकरच 5G येणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र अजूनही ग्राहक 5Gची वाट बघताहेत. मात्र अमेरिका आणि चीन हे देश 5Gच्या समोर जाऊन आता 6G च्या मागे लागले आहेत. 6G इंटरनेटचं पेटंट मिळवण्यासाठी या देशांमध्ये अक्षरशः चुरस सुरु आहे. 

अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश सध्या 6G इंटरनेट जगात सर्वप्रथम लाँच करून देशाला पेटंट मिळवून देण्याच्या तयारीत आहेत. या सर्व प्रक्रियेला कमीतकमी १० वर्ष असले तरी जगभरातील टेलिकॉम क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी या दोन्ही देशांची शर्यत सुरू आहे. 5G इंटरनेटच्या लौंचिंगनंतर अमेरिकेमुळे चीनच्या काही कंपन्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र Huawei कंपनीनं 5G च्या आकर्षक किमती ग्राहकांना दिल्या त्यामुळे अमेरिकी कंपन्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळे चीन 5G लीडरच्या भूमिकेत दिसून आला होता. 

हेही वाचा - तुमचा लाइफ पार्टनर वजन कमी करतोय? तर 'या' ४ सोप्या पद्धतीनं करा त्याला मदत

"5Gच्या तुलनेत 6G च्या लीडरशिपसाठीची चुरस अधिक प्रमाणात प्रभावी असू शकते. तसंच अमेरिकासुद्धा यावेळी यात स्वतःला मागे ठेवणार नाही."  असं अमेरिकेतील एका कन्सल्टन्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हे सूचित करणारं ट्विटही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. 

मात्र चीन 6G लीडरशिप मिळवण्याच्या प्रक्रियेत आधीपासूनच पावलं उचलत आहे. टेलिकॉम उपकरणं बनवणारी कंपनी ZTEनं चीनच्या Unicom Hong Kong या कंपनीसोबत मिळून 6G इंटरनेटवर प्रभावीपणे काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे चीननं नोव्हेंबरमध्ये 6G ट्रान्समिशनसाठी एयरवेव्सची चाचणी करण्यासाठी एक सॅटेलाईट लाँच केलं होतं. तसंच कॅनेडामध्ये Huawei कंपनीचं एक 6G संशोधन केंद्रही आहे. 

मात्र तिकडे अमेरिकाही चीनपेक्षा मागे नाहीये. अमेरिकेनं 6Gची लीडरशिप मिळवण्यासाठी 'नेक्स्ट जी अलायंस' ला सुरुवात केली आहे. यात काही मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ॲपल, AT&T, Qualcomm, गुगल, सॅमसंगसारख्या मोठ्या कंपन्या या युतीत सामील आहेत. मात्र अमेरिकेनं चीनच्या कुठल्याही कंपनीला यात जागा दिलेली नाही. त्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांतील संघर्ष दिसून येत आहे. 

नक्की वाचा - हिरड्यांमधून रक्त येतंय? जरा थांबा. हे असू शकतं शरीरातील अनेक रोगांचं लक्षण

विशेष म्हणजे जगातील अनेक देश 5G टेक्नॉलॉजिचा विरोध करत आहेत तर काही समर्थनात आहेत. जापान, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि इंग्लंड यांसारख्या देशांनी आपल्या 5Gच्या मध्यमातून या फर्मला बंद केलंय. तर रूस, फिलीपींस, थायलंड आणि अफ्रीका या देशांनी चिनी कंपनीचं स्वागत केलं आहे. विशेषश म्हणजे गेल्या वर्षी NOKIAसारख्या मोठ्या कंपनीनंही 6G वायरलेस प्रोजेक्टची सुरुवात केली आहे ज्यामध्ये अनेक युनिव्हर्सिटींचा समावेश आहे. 

एकूणच काय तर अजून भारतात लोकं 5Gची आतुरतेनं वाट बघत असताना तिकडे अमेरिका आणि चीन मात्र 6G टेक्नॉलॉजीची लीडरशिप मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ