Alert for Android Users: गुगल प्ले स्टोअरवरच होता मोठा धोका! फोनमधून लगेच डिलीट करा 'हे' 4 अ‍ॅप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google play store

Alert for Android Users: गुगल प्ले स्टोअरवरच होता मोठा धोका! फोनमधून लगेच डिलीट करा 'हे' 4 अ‍ॅप्स

Android स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अ‍ॅप्स डाउनलोड करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे Google Play Store. चिंतेची बाब म्हणजे गुगल प्ले स्टोअर पूर्णपणे सुरक्षित नाही आणि त्यावरील अनेक अ‍ॅप्समध्ये मालवेअरसारखे धोकेही येतात. आता यूजर्सना चार धोकादायक अ‍ॅप्स तात्काळ डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे.

एकाधिक सुरक्षेचे स्तर असूनही, अटॅकर्स आणि स्पॅमर प्ले स्टोअरवर मोठ्या प्रमाणात अ‍ॅप्स लिस्ट करतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्रास सहन करावा लागतो.अशा काही अ‍ॅप्सची माहिती समोर आली आहे, जे यूजर्सचा संवेदनशील डेटा चोरत आहेत आणि सुरक्षा रिसर्चर्सनी त्यांना त्वरित हटवण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: Elon Musk: 'ठुकरा के मेरा प्यार…'; ट्विटर विकत घेताच इलॉन मस्कच्या 'एक्स गर्लफ्रेंड'चं अकाउंट डिलीट

मालवेअर अ‍ॅप्समध्ये Android ट्रोजन्स

Malwarebytes Labs मधील सुरक्षा संशोधकांनी अशा चार Android अ‍ॅप्स रिपोर्ट केले आहेत जे Google Play Store वर होते आणि त्यांच्या मदतीने Android ट्रोजन डिव्हाइसेसवर वितरित केले जात होते. 'Android/Trojan.HiddenAds.BTGTHB' ट्रोजन असलेले हे अ‍ॅप्स लाखो वेळा डाउनलोड केले गेले आहेत आणि सर्व एकाच अॅप डेव्हलपर मोबाइल अ‍ॅप्स ग्रुप (Mobile Apps Group) ने विकसित केले आहेत.

हेही वाचा: AUS vs AFG : 'वर्ल्डकप'मध्ये अफगाणिस्तानचा खेळ खल्लास! नबीनं ट्विट करत सोडलं कर्णधारपद

हे Apps ताबडतोब हटवा

तुमच्या स्मार्टफोनमध्ये यापैकी कोणतेही App असतील किंवा इन्स्टॉल केले असतील, तर ते त्वरित हटवा,

- Bluetooth Auto Connect

- Driver: Bluetooth, Wi-Fi, USB

- Bluetooth App Sender

- Mobile Transfer: Smart Switch

हेही वाचा: Congress: 'बहिण-भावाचं पटत नाहीये, म्हणून दीड महिना होऊनही…''; राहुल-प्रियंकाबाबत भाजप नेत्याचा दावा

फिशिंग साइट्स

रिसर्चर्सनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की हे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर त्यांनी मलिशियस बिहेवियर सुरू करत आणि Google Chrome किंवा मोबाइल ब्राउझरमध्ये फिशिंग साइट उघडण्यास सुरुवात करत होत्या. वापरकर्त्यांना याची माहिती देखील नव्हती आणि ते साइट्सवर पे-पर-क्लिकच्या आधारावर कमाई करत होते. डिव्हाइस लॉक असतानाही, Chrome टॅब बॅकग्राऊंडमझ्ये उघडे राहत होते आणि वापरकर्त्याने अ‍ॅप आयकनला टच करताच ते दाखवले जात.

म्हणजेच मालवेअर असलेले अ‍ॅप्स छुप्या पद्धतीने जाहिराती दाखवत होते आणि वापरकर्त्यांना त्यावर टॅप करवून घेतले जात होते. या जाहिराती दाखवण्यासाठी वापरकर्त्यांच्या डेटाची मदत घेण्यात आली आणि त्यांच्या आधी घेतलेल्या परवानग्यांच्या मदतीने हा डेटा गोळा करण्यात आला. हेच कारण आहे की Play Store वरून अॅप्स डाउनलोड करताना तुमची रिव्ह्यू आणि रेटिंग तपासणे खूप महत्वाचे आहे.

टॅग्स :Technology