Diabetes : मधुमेहींसाठी जीवाणूजन्य मलमपट्टी ; एनसीएलकडून काष्ठतंतूंची निर्मिती; वैद्यकीय चाचण्यांची तयारी

मधुमेहींच्या पायाला होणाऱ्या जखमा सहसा बऱ्या होत नाहीत. याबाबत आजची आधुनिक औषधे व उपचार पद्धतीही निकामी ठरत आहे. परंतू नुकताच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) शास्त्रज्ञांनी एक जीवाणूजन्य काष्ठतंतू विकसित केला आहे.
Diabetes
Diabetes sakal

पुणे : मधुमेहींच्या पायाला होणाऱ्या जखमा सहसा बऱ्या होत नाहीत. याबाबत आजची आधुनिक औषधे व उपचार पद्धतीही निकामी ठरत आहे. परंतू नुकताच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) शास्त्रज्ञांनी एक जीवाणूजन्य काष्ठतंतू विकसित केला आहे. त्याची मलमपट्टी मधुमेहींच्या जखमांवर रामबाण उपाय ठरत असून, यासंबंधी वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.

जीवाणूजन्य काष्ठतंतूवर (सेल्युलोज) जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र, एनसीएलच्या डॉ. सईद दस्तगीर यांच्या नेतृत्वात डॉ. मेघना थोरात व आशिष जगताप यांनी विकसित केलेला काष्ठतंतू खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला आहे. डाळिंबाच्या फळावर आढळणाऱ्या ‘कोमागाटायबॅक्टर रेएटिकस पीजी-२’ नावाचा जीवाणू शास्त्रज्ञांनी विलग केला. त्याची प्रयोगशाळेत वाढ करत विश्लेषणही केले. आतापर्यंतच्या जीवाणूंपेक्षा हा जीवाणू सर्वाधिक काष्ठतंतूंची निर्माण करत आले. विशेष म्हणजे याची शुद्धता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, रासायनिक शुद्धता ही कापसापेक्षा जास्त आहे. यासंबंधीचे संशोधन रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या शोधपत्रिकेत प्रकाशित केले आले आहे.

मधुमेहींचे बॅंडेज

‘कोमागाटायबॅक्टर रेएटिकस पीजी-२’ नावाच्या जीवाणूपासून निर्माण झालेल्या काष्ठतंतूंचा मलमपट्टीसाठी वापर करण्यात येतो. यासाठी धारवाडच्या एसडीएम रुग्णालयाशी करार करण्यात आला असून, या काष्ठतंतूमिश्रित बॅंडेजमुळे मधुमेही रुग्णांची जखम दोन आठवड्यांत बरी होत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. संशोधन थेट सर्वसामान्यांच्या उपयोगात यावे म्हणून रॅपिड क्युअर हेल्थकेअरशी करार केला असून, भविष्यात २०० रुग्णालयांत त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहेत.

नैसर्गिक पद्धतीने विकसित होणारा जीवाणूजन्य काष्ठतंतू

सर्वसामान्य तापमानाला अर्थात २८ अंश सेल्सिअसला १० दिवसांत निर्मिती होते.नॅनो फायबरस असलेला हा काष्ठतंतू वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त फ्रुक्टोज, ग्लुकोजपेक्षा ग्लिसरॉलचे प्रमाण सर्वाधिकग्लिसरॉलपासून स्वस्त दरात हरित इंधनाची निर्मितीरंगमिश्रित पाण्याच्या शुद्धीकरणापासून ते एन-९९ दर्जाच्या मास्कच्या निर्मितीसाठी उपयुक्त

काष्ठतंतूंचे उत्पादन

  • एका लिटरमागे जवळपास ७५० ग्रॅम ओल्या काष्ठतंतूंचे उत्पादन मिळते

  • सर्वसामान्य तापमानाला १० दिवसांत व रिॲक्टर वापरल्यास पाच दिवसांत उत्पादन

  • घेता येते

  • बॅंडेजसाठी कोणत्याही चिकटपट्टीची गरज नाही

Diabetes
Drains Covers : पावसाळी गटारांसाठी बनविले सुरक्षित झाकण ; पुण्याच्या डॉ. सोरटे यांनी प्राप्त केले पेटंट

जीवाणूजन्य काष्ठतंतूंचे वैद्यकीय उपचारात विशेष महत्त्व आहे. आम्ही शोधलेल्या जीवाणूमुळे काष्ठतंतूंचे उत्पादन तर जास्त मिळते, त्याचबरोबर मधुमेहासारख्या गंभीर आजारातही त्याची भूमिका स्पष्ट होत आहे. समाजाच्या गरजा ओळखून उपयोजित संशोधनावर आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानावर आमचा भर आहे.

- डॉ. सय्यद दस्तगीर,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, एनसीएल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com