esakal | Apple Event 2021 : आज लॉंच होणार iPhone 13 सीरीज; 'येथे' पाहा इव्हेंट
sakal

बोलून बातमी शोधा

Apple Event 2021

आज लॉंच होणार iPhone 13 सीरीज; 'येथे' पाहा इव्हेंट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Apple Event 2021 : नवीन iPhone 13 आणि Apple Watch 7 सीरीज आज भारतात लाँच होणार आहे. या बद्दल Apple चाहत्यांमध्ये उत्सुकता असून या वर्षीच्या आयफोन मॉडेलच्या हार्डवेअर अपडेट्स व्यतिरिक्त फोनमध्ये 5G वर लक्ष केंद्रित करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान आजचा Apple Event 2021 हा कंपनीचा वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आहे.

फीचर्स काय असतील?

गेल्या वर्षीच्या तुलनेत टेलिकॉम कंपन्यांनी यावर्षी 5G नेटवर्कचा चांगला विस्तार केला आहे. तसेच 5G सेवा सुधारण्यावर बरेच काम केले आहे. त्यामुळे Apple 5G बद्दल काय घोषणा करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक विश्लेषकांच्या मते, आगामी iPhone13 च्या नवीन मॉडेलमध्ये आयफोन 12 च्या तुलनेत बाह्यरुपात फारसा फरक दिसणार नाही. पण फोनमध्ये फास्ट वाय-फाय आणि प्रोसेसर चिपसेट दिला जाईल. फोनच्या टॉप मॉडेलमध्ये फोकस डिस्प्ले आणि कॅमेरा क्वालटी वाढवण्यावर कंपनीचा भर असेल. फोनमध्ये शूटिंग करताना पोर्ट्रेट मोडमधून शूटिंग मोड दिला जाऊ शकतो. तसेच Apple कडून Apple Watchला अपडेट दिले जाऊ शकते.

Apple कंपनी सध्या अधिकाधिक फिटनेस फीचर्सवर काम करत आहे, जे थेट Apple Fitness+शी जोडलेले आहे. Apple ची ही पेड सर्व्हिस असुन तुम्हाला यामध्ये वर्कआउट्स बद्दल मार्गदर्शन केले जाते. तसेच यावर Appleचे प्रशिक्षक देखील उपलब्ध असतात.

हेही वाचा: MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स? वाचा

इव्हेंटमध्ये काय होणार लाँच ?

iPhone 13 सीरीजमध्ये iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे चार मॉडेल्स लॉंच केले जातील अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली आहे. सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे ते नवीन iPhone च्य कॅमेराकडे. या फोनच्या कॅमेरामध्ये सर्वात मोठे बदल अपेक्षित आहेत.

इव्हेंट कुठे पाहता येईल?

हा इव्हेंट आज भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान कोरोनामुळे या कार्यक्रमाचे आयोजन व्हर्चुअली केले जाईल आणि त्याचे लाईव्ह प्रसारण केले जाईल. हा इव्हेंट लाईव्ह पाहण्यासाठी तुम्ही Apple च्या वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच हा कार्यक्रम कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर थेट लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसचे Apple वापरकर्ते हा कार्यक्रम Apple टीव्हीवर देखील पाहू शकतील.

हेही वाचा: 2021 Force Gurkha दमदार SUV, लवकरच होतेय लॉंच; पाहा फीचर्स

loading image
go to top