iPhone 15 series Sale : भारतात आजपासून विक्री सुरू; मुंबईत सकाळपासूनच स्टोअरबाहेर रांगा; जाणून घ्या किंमत अन् ऑफर्स

Apple iPhone 15 series to go on sale in India from today 22 septermber check prices and Details
Apple iPhone 15 series to go on sale in India from today 22 septermber check prices and Details

जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अ‍ॅप्पलने 13 सप्टेंबर रोजी iPhone 15 सीरिज लाँच केली. त्यात चार मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात अ‍ॅप्पल iPhone 15 ची प्री-बुकिंग 15 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. दरम्यान आयफोन 15 हा आजपासून (22 सप्टेंबर) स्टोअरमध्ये उपलब्ध झाला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी आयफोन चाहत्यांनी अ‍ॅप्पल स्टोअरबाहेर सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईतील बीकेसीयेथील भारतातील पहिल्या अॅप्पल स्टोअरमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळली. दरम्यान नुकचेट लाँच झालेल्या आयफोनच्या नवीन सीरिजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये देखील iPhone 15 आणि iPhone 15 Plus प्रमाणेच युएसबी Type-C चार्जिंग पोर्ट आहे. आयफोन 15 च्या प्रो मॉडेल्समध्ये नवीन A17 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की या चिपसेटमध्ये A16 पेक्षा चांगली कार्यक्षमता आणि अधिक पॉवर आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन 6.7 इंच आहे.

पेमेंट ऑप्शन आणि कॅशबॅक ऑफर

एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे iPhone 15 सीरिजमधील कोणताही स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांपर्यंतचा इंस्टंट कॅशबॅक मिळू शकतो. याशिवाय कॅशिफायच्या माध्यमातून ग्राहकांना 6000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा पर्यायही उपलब्ध आहे.

AppleCare+ वर 20 टक्के सूट

आयफोन 15 सीरिजमधील स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना AppleCare+ वर 20 टक्के सूट मिळेल. AppleCare+ मध्ये 50 GB ते iCloud स्टोरेजसह अ‍ॅक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन आणि त्याच दिवशी स्क्रीन रिपेयर देखील मिळते.

Apple iPhone 15 series to go on sale in India from today 22 septermber check prices and Details
NCP Crisis : शरद पवार गटाविरोधात अजित पवार गटाची मोठी खेळी; आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी...

आयफोन 15 सीरीजचे स्पेसिफिकेशन

-डिस्प्ले 6.10 इंच

-प्रोसेसर Apple A16 बायोनिक

-फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सेल

-रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल

-रॅम 8 जीबी

-स्टोरेज 128 जीबी

-OS iOS 17

-रिझोल्यूशन 11695x5x5 पिक्सेल

Apple iPhone 15 series to go on sale in India from today 22 septermber check prices and Details
Sukha Duneke Murder : लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली 'सुक्खा'च्या हत्येची जबाबदारी! फेसबुकवर इतरांनाही दिली धमकी

किंमत किती आहे?

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, आयफोन 15 सीरीज 'मेड इन इंडिया' असूनही, त्याची किंमत अमेरिका आणि दुबईच्या तुलनेत सर्वाधिक आहे. प्रो व्हेरियंटमध्ये किमतीतील फरक आणखीच जास्त वाढतो.

अमेरिकेत iPhone 15 ची किंमत $799 आणि iPhone 15 Plus ची किंमत $899 आहे. तर iPhone 15 Pro ची किंमत $999 आणि iPhone 15 Pro max ची किंमत $1199 ठेवण्यात आली आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत iPhone 15 सीरीजच्या बेस 128 GB मॉडेलसाठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com