
चीन सोडून भारत अन् दक्षिणपूर्व आशियामध्ये उत्पादन वाढवण्याची Appleचा प्लॅन: रिपोर्ट
चीनच्या कठोर अँटी-कोविड नियमांमुळे नाराज झालेल्या अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी अॅपलने (Apple Inc.) आता भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने, या प्रकरणाशी परिचित लोकांचा हवाला देत रिपोर्ट दिला आहे की Apple Inc. ने त्यांच्या काही उत्पादकांना सांगितले आहे की, ते चीनच्या बाहेर उत्पादन वाढवू इच्छित आहेत.
भारत आणि व्हिएतनाम हे देश अॅपल उत्पादनाचे केंद्र आहेत आणि त्यांच्याकडे चीनला पर्याय म्हणून पाहिले जात आहेत, असंही या अहवालात म्हटले आहे. (Apple planning to ramp up production in India and Southeast Asia except China: Report)
हेही वाचा: कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय
युक्रेनवरील रशियन हल्ल्याला बीजिंगचा अप्रत्यक्ष पाठिंबा आणि COVID-19 चा सामना करण्यासाठी चीनमधील काही शहरांमध्ये लादण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, Apple ने हे पाऊल उचललं आहे. विश्लेषकांच्या मते, iPhones, iPads आणि MacBook लॅपटॉपसह Apple ची 90 टक्क्यांहून अधिक उत्पादने चीनमध्ये बाह्य कंत्राटदारांद्वारे उत्पादित केली जातात.
एप्रिलमध्ये Apple कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक म्हणाले, "आमची पुरवठा साखळी ही जागतिक आहे आणि त्यामुळे आमची उत्पादने सर्वत्र तयार केली जातात."
हेही वाचा: Apple वापरकर्त्यांना धक्का! कंपनीने वाढवल्या AirPods च्या किमती
चीनमध्ये वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शांघाय आणि इतर शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक पाश्चात्य कंपन्यांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. एप्रिलमध्येच, Apple ने म्हटलं होतं की, पुन्हा कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे चालू तिमाहीत 8 अब्ज डॉलर पर्यंतच्या उत्पन्नात अडथळा येऊ शकतो.
Web Title: Apple Planning To Ramp Up Production In India And Southeast Asia Except China Report
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..