
Appleचे घड्याळ देणार heart attackचा इशारा
मुंबई : आजच्या युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी आपले जीवन खूप सोपे केले आहे. आता कोणतेही काम करण्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही. मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक Apple येत्या काही महिन्यांत आयफोन १४ सीरीजचे अनावरण करणार आहे, तर दुसरीकडे, Apple यावर्षी Apple Watch Series 8 नावाचे नवीन स्मार्टवॉच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा: 50MP कॅमेऱ्यासह 5G Smartphone लॉन्च; मिळेल १५०० रुपयांपर्यंत सवलत
लॉन्च होण्यापूर्वी स्मार्टवॉचचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत. Apple ने नुकताच त्यांचा WWDC 2022 इव्हेंट आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी नवीन M2 समर्थित मॅकबुकची घोषणा केली. Apple WWDC 2022 इव्हेंटमध्ये, या स्मार्टवॉचच्या अनेक वैशिष्ट्यांविषयी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे जीव वाचू शकतो. चला तर मग या फीचर्सबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
हेही वाचा: Appleने लॉन्च केले आहे ios 16 ; जाणून घ्या वैशिष्ट्ये
नुकत्याच झालेल्या इव्हेंटमध्ये Apple ने त्याच्या स्मार्टवॉचसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम, watchOS 9 ची घोषणा केली आहे. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने स्मार्टवॉचमध्ये अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. या फीचरच्या मदतीने आता लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराची अगोदरच माहिती मिळणार आहे. watchOS 9 अंतर्गत एक नवीन बायोमॉनिटरिंग सेन्सर समाविष्ट केला आहे, जो AFib बर्डन डिटेक्शनसाठी उपयुक्त ठरेल. अॅपलचे हे वैशिष्ट्य लोकांना त्यांच्या हृदयाचे ठोके सामान्य नसल्यास सूचित करेल. लीक झालेले अहवाल सूचित करतात की नवीन Apple Watch Series 8, जी या वर्षाच्या शेवटी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे, एखादी व्यक्ती किती वेळा अॅट्रियल फायब्रिलेशन स्थितीत आहे यावर लक्ष ठेवू शकते.
Web Title: Apple Watch Series 8 New Watch Will Give You Alert Of Heart Attack
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..